‘बाहुबली’च्या कलाकारांचे बॉलिवूड कनेक्शन तुम्हाला माहित आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 15:42 IST2017-04-29T09:25:19+5:302017-04-29T15:42:16+5:30
चित्रपट, आयटम सॉँग किंवा अल्बममधून एखादा कलाकार रातोरात प्रसिद्धी झोतात आल्याचे आपण बºयाचदा ऐकतो. मात्र, एखाद्या चित्रपटातून सर्वच कलाकार ...
.jpg)
‘बाहुबली’च्या कलाकारांचे बॉलिवूड कनेक्शन तुम्हाला माहित आहे काय?
च त्रपट, आयटम सॉँग किंवा अल्बममधून एखादा कलाकार रातोरात प्रसिद्धी झोतात आल्याचे आपण बºयाचदा ऐकतो. मात्र, एखाद्या चित्रपटातून सर्वच कलाकार एकाच रात्री हिट झाल्याचा प्रसंग क्वचितच म्हणावा लागेल. सध्या असेच काहीसे चित्र ‘बाहुबली’ सीरिजच्या कलाकारांबाबत बघावयास मिळत आहेत. कारण या चित्रपटातील असे कोणतेच पात्र नाही, जे प्रेक्षकांना भावले नसेल. मग ते नकारात्मक असो वा सकारात्मक. प्रत्येक पात्राने प्रेक्षकांवर अक्षरश: छाप पाडली आहे. साउथ इंडस्ट्रीमधून एखाद्या चित्रपटातील सर्वच कलाकारांना एवढे प्रेम मिळणे बहुधा प्रथमच घडले असेल. मात्र या कलाकारांनी केवळ साउथमध्येच आपल्या अभिनयाची छाप पाडली नसून, त्याचे बॉलिवूड कनेक्शनही सर्वश्रुत आहे. याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...
![]()
प्रभास (राजा अमरेंद्र बाहुबली)
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-२’ मध्ये अतिशय दमदार भूमिका साकारणारा प्रभास अर्थात ‘बाहुबली’ याला साउथसह बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या जबरदस्त आॅफर्स मिळत आहेत. ‘बाहुबली-२’ बरोबरच त्याच्या आगामी ‘साहो’ अॅक्शनपटाचाही ट्रेलर रिलीज केला गेल्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज त्याच्याबरोबर चित्रपट करण्यास उत्सुक आहेत. आगामी काळात प्रभास बॉलिवूडमधील चर्चेतला चेहरा ठरू शकेल, यात शंका नाही.
![]()
राणा दग्गुबती (भल्लालदेव)
‘बाहुबली’मधील भल्लादेव अर्थात राणा दग्गुबती हा तसा बॉलिवूडमधील चर्चित चेहरा आहे. कारण त्याने अनेक बॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. २०११ मध्ये ‘दम मारो दम’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाºया राणाने ‘बेबी, द गाझी अॅटक, ये जवानी हैं दिवानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘दम मारो दम’ या चित्रपटानंतर त्याचे नाव बिपाशा बसू हिच्याशी जोडले गेल्याने तो त्यावेळी खूपच चर्चेत आला होता.
![]()
राम्या कृष्णन (शिवगामी देवी)
‘मेरा वचन ही शासन हैं’ हा ‘बाहुबली’मधील भारदस्त डायलॉग जरी आठवला तरी लगेचच राजमाता शिवगामी देवी अर्थात राम्या कृष्णन यांचा चेहरा समोर येतो. वास्तविक राम्या कृष्णन यांचे बॉलिवूडशी तसे जुने नाते आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याबरोबर त्यांनी ‘दयावान’ या सुपरहिट चित्रपटात काम केले होते. चित्रपटात विनोद खन्नाबरोबर चित्रित केलेले त्यांचे ‘चाहे मेरी जान तू लेले’ हे गाणे त्यावेळी खूपच हिट ठरले होते. यासह त्यांनी अनेक बॉलिवूडपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. जसे की, संजय दत्तचा ‘खलनायक, अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांचा ‘बडे मियॉँ-छोटे मियॉँ’मध्ये त्या बघावयास मिळाल्या.
![]()
तमन्ना भाटिया (अवंतिका)
‘बाहुबली’च्या पहिल्या भागात अवंतिका हे डॅशिंग पात्र स्वीकारणारी तमन्ना भाटिया ‘बाहुबली-२’मध्ये फारशी झळकली नाही. मात्र तमन्ना साउथबरोबर बॉलिवूडमधीलही चर्चेतला चेहरा आहे. तिने ‘ये चॉँद सा रोशन चेहरा, हिम्मतवाला, तुतक तुक तुतिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती साउथसह बॉलिवूडमधील प्रोजेक्टवर काम करीत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तिच्या फॅन फॉलोइंगची संख्या चांगली आहे.
![]()
सत्यराज (कटप्पा)
‘बाहुबली’मधील सर्वाधिक चर्चेतले नाव म्हणजे कटप्पा. कारण ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हा अतिशय गहन प्रश्न याच पात्राच्या भोवती फिरणारा आहे. त्यामुळे त्यांना सत्यराज या नावापेक्षा कटप्पा या नावानेच अधिक ओळखले जात आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की, कटप्पा बॉलिवूड कनेक्शन काय आहे? होय, कटप्पा म्हणजेच सत्यराज यांनी बॉलिवूडमधील एका सुपरहिट चित्रपटात भूमिका साकारली आहे. शाहरूख खान याच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात त्यांनी दीपिका पादुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.
![]()
नासीर (बिज्जलदेव)
देवसेना आणि बाहुबलीच्या प्रेमात अडथळा ठरणारे बिज्जलदेव अर्थात नासीर यांचेही बॉलिवूड कनेक्शन राहिले आहे. त्यांनी सनी देओल यांच्या ‘अंगरक्षक’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. त्याव्यतिरिक्त ‘चाची ४२०’, ‘राउडी राठोड’ आणि ‘साला खडूस’ या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.