​‘शाहरूख माझ्यासोबत काम करेल, असे वाटत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 17:17 IST2016-11-03T17:17:28+5:302016-11-03T17:17:28+5:30

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिला एक तक्रार आहे. होय, ही तक्रार कुणाबद्दल तर शाहरूख खान याच्याबद्दल. सोनमला शाहरूखसोबत काम ...

'Do not think that Shahrukh will work with me' | ​‘शाहरूख माझ्यासोबत काम करेल, असे वाटत नाही’

​‘शाहरूख माझ्यासोबत काम करेल, असे वाटत नाही’

लिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिला एक तक्रार आहे. होय, ही तक्रार कुणाबद्दल तर शाहरूख खान याच्याबद्दल. सोनमला शाहरूखसोबत काम करायचेयं. पण शाहरूख तिच्यासोबत काम करण्यासाठी राजी होईल, असे तिला वाटत नाही. एका मुलाखतीत तिने ही ‘गोड’ तक्रार बोलून दाखवली. शाहरूख माझ्यासोबत काम करेल,असे मला वाटत नाही. त्याच्यासोबत काम करण्याच्या अनेक संधी आहेत. मला त्याच्यासोबत काम करायला आवडेलही. मी तसे प्रयत्नही केलेत. पण मला तशी संधी मिळाली नाही. माझे सगळेच प्रयत्न फसले. कदाचित त्याला जेव्हा माझ्यासोबत काम करावेसे वाटेल, तेव्हाच माझ्या प्रयत्नांना यश येईल, असे ती म्हणाली. केवळ एवढेच नाही तर यानंतरही सोनम बरेच काही बोलली. आपल्या सिने इंडिस्ट्रिमध्ये कुण्या अभिनेत्रीसोबत काम करायचे हे अभिनेता ठरवतो. त्याच्या आवडीच्याच अभिनेत्रीची त्याच्या चित्रपटात वर्णी लागते. शाहरूखचे म्हणाल तर त्याचेही कदाचित असेच असावे. मला त्याच्यासोबत काम करायचेयं. पण कदाचित त्याला ते नको असेल, असेही ती म्हणाली.
आता सोनमने शाहरूखला टोला लागवला की त्याच्याआडून सर्व अभिनेत्यांना हे सोनमलाच ठाऊक़ पण आमचे विचाराल तर सोनमला शाहरूखसोबत काम करण्याची संधी मिळावी,अशीच आमची सदिच्छा असेल. सोनम सलमान खानसोबत ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसलीय.  आता शाहरूख खानसोबत ती कधी स्क्रिन शेअर करते, ते बघूच. 

 
  

Web Title: 'Do not think that Shahrukh will work with me'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.