धोनी, हरभजन आणि रैनाच्या मुलींचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल; ‘या’ गाण्यावर धरला ठेका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 18:49 IST2018-04-29T13:19:03+5:302018-04-29T18:49:13+5:30
सध्या आयपीएल सुरू असून, त्यामध्ये स्टार डॉटर्सच्या मुली चांगल्याच प्रसिद्धीझोतात आहेत. विशेषत: धोनीची चिमुकली सातत्याने लाइमलाइटमध्ये राहत आहेत. आता असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

धोनी, हरभजन आणि रैनाच्या मुलींचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल; ‘या’ गाण्यावर धरला ठेका!
आ पीएल २०१८ मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची मुलगी जिवा हिचे बरेचसे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हरभजनसिंगने रविवारी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये त्याची मुलगी हिनाया, धोनीची मुलगी जिवा आणि सुरेश रैनाची मुलगी ज्रेसिया डान्स करताना बघावयास मिळत आहेत. या तिन्ही स्टार डॉटर्स ‘रिंगा रिंगा रोजेस’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. एकमेकींचा हात पकडून या तिघींची धमालमस्ती बघण्यासारखी आहे. तिघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भज्जीने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रिंगा रिंगा रोजेस आणि या तीन चिमुकल्या पºयांसोबत माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, तिघीही सारख्याच वयाच्या असून, त्यांच्यातील मैत्री चांगलीच घट्ट आहे. आगामी काळातही त्यांच्यातील मैत्री अशीच दृढ होत जाईल असेच काहीसे दिसून येते.
दरम्यान, एम. एस. धोनीची मुलगी जिवा आयपीएलमध्ये सातत्याने चर्चेत राहत आहे. कधी शाहरूख खानसोबत डान्स करताना ती दिसत आहे, तर कधी मॅच सुरू असतानाच पापाला भेटायचे असा हट्ट धरून बसत आहे. तिच्या या सर्व लीलांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धोनीने आपली मैत्रीण साक्षी रावत हिच्याशी २०१० मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या पाच वर्षांनंतर म्हणजेच २०१५ मध्ये जिवाचा जन्म झाला.