दीपिका म्हणाली, माझा मार्ग प्रियाकांचा असूच शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 21:05 IST2016-11-04T21:05:39+5:302016-11-04T21:05:39+5:30
प्रियांका चोप्रा हिच्यासोबत स्पर्धा नसल्याचे दीपिका पादुकोण म्हणालीय. दीपिकाच्या मते तिचा आणि प्रियांकाच्या मार्ग वेगवेगळा आहे. प्रियांकाला हॉलिवूड चित्रपटासह ...
दीपिका म्हणाली, माझा मार्ग प्रियाकांचा असूच शकत नाही
बॉलिवूडमध्ये प्रियांका व दीपिकाच्या करिअरची तुलना करता येत नाही, मात्र दीपिका व प्रियांकाने हॉलिवूडमध्ये आपली सुरुवात जवळपास सारखीच केली आहे. दोघींमध्ये चांगलीच स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. दोघींनी बाजीराव मस्तानी या चित्रपटात एकत्र क ाम केले होते. यानंतर दोघींना हॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. दीपिका पादुकोण हॉलिवूड अभिनेता विन डिझेल सोबत ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर के ज’ या चित्रपटात विनच्या अपोझिट दिसणार आहे. तर प्रियांका चोप्रा ड्वेन जॉनसनसोबत (द रॉक) बेवॉच या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. दोघींच्या चित्रपटांत ही समानता आहे क ी या चित्रपटाचे नायक प्रसिद्ध अॅक्शन स्टार आहेत.
मात्र यावर दीपिकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपिका म्हणाली, दोघींची सुरुवात वेगवेगळी होती. जेव्हा प्रियांकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा मी शाळेत होते. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखते आणि आमच्यात काहीच बदललेले नाही. प्रत्येकाचा मार्ग व यात्रा वेगवेगळी असते, तिला आपल्या करिअरमधून जे हवे असेल त्याची मला गरज असेल असे नाही. हे आपल्याला समजून त्याचा सन्मान करायला हवा.
प्रियांकाला दीपिकाच्या तुलनेत हॉलिवूडमध्ये अधिक यशस्वी मानली जाते कारण तिने चित्रपटातच नव्हे तर अमेरिकन मालिकेतही काम मिळविले आहे.