फिटनेस चॅलेंज स्विकारून दीपिका पादुकोणची झाली फसगत; यूजर्सनी केली पोलखोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 14:01 IST2018-05-25T08:31:01+5:302018-05-25T14:01:11+5:30

सध्या देशभरात फिटनेस चॅलेंज हा ट्रेंड चांगलाच हिट होतांना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी हे चॅलेंज स्विकारून त्यांचे व्हिडीओ अपलोड करीत आहेत, असाच काहीसा व्हिडीओ दीपिकाने अपलोड केला, मात्र यूजर्सनी तिची पोलखोल केली.

Deepika Padukone's fitness challenge; Moline Kelly Pollock! | फिटनेस चॅलेंज स्विकारून दीपिका पादुकोणची झाली फसगत; यूजर्सनी केली पोलखोल!

फिटनेस चॅलेंज स्विकारून दीपिका पादुकोणची झाली फसगत; यूजर्सनी केली पोलखोल!

लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिने बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचे चॅलेंज स्विकारत तिच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दीपिकाने धावतानाचा एक झिप व्हिडीओ पोस्ट केला आहे. काळ्या रंगाच्या ट्रॅकशूटमध्ये दीपिका मॉर्निंग वॉक करताना दिसत आहे. हे ट्विट करताना दीपिकाने लिहिले की, ‘मी माझ्या फिटनेसविषयी खूपच उत्साहित आहे. आता माझे नवे ध्येय आहे रनिंग. थॅक्यू पीव्ही सिंधू... तुझे चॅलेंज मी स्विकारले आहे. आता मी मिताली राज, राणी रामपाल आणि आदिती अशोक यांना हे चॅलेंज देऊ इच्छिते. कारण आम्ही आम्ही फिट तर इंडिया फिट.’
">http://

फिटनेस चॅलेंजमध्ये भाग घेतल्याचा दीपिकाचा हा व्हिडीओ काही वेळातच सर्वत्र व्हायरल होत आहे. दीपिकाच्या या ट्विटचा सोशल मीडिया यूजर्सकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. कारण अनेकांनी तिच्या या ट्विटला विचित्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देताना तिची चांगलीच फिरकी घेतली आहे. तर काहींनी दीपिकाच्या या प्रामाणिक प्रयत्नाचे कौतुकही केले. दरम्यान, केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर फिटनेस चॅलेंज दिले होते. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ते सलग पुश-अप मारताना दिसत होते. यावेळी त्यांनी सर्वांना त्यांचा फिटनेस मंत्रही सांगितला. तसेच या फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केले. ज्यानंतर मोठ-मोठ्या सेलिब्रिटींनी या चॅलेंज स्विकारण्यास सुरुवात केली आहे. 

Is this a fitness GIF , common mam show us your real fitness, show us push ups

Web Title: Deepika Padukone's fitness challenge; Moline Kelly Pollock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.