फिटनेस चॅलेंज स्वीकारून दीपिका पादुकोणने करून घेतले स्वत:चेच हसू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 14:26 IST2018-05-28T08:44:24+5:302018-05-28T14:26:30+5:30

क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फिटनेस व्हिडिओमुळे फिटनेसप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही़. ...

Deepika Padukone took a fitness challenge and made herself smile !! | फिटनेस चॅलेंज स्वीकारून दीपिका पादुकोणने करून घेतले स्वत:चेच हसू!!

फिटनेस चॅलेंज स्वीकारून दीपिका पादुकोणने करून घेतले स्वत:चेच हसू!!

रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फिटनेस व्हिडिओमुळे फिटनेसप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही़. क्रीडा मंत्र्यांनी स्वत: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅग करत, या अभियानाशी जुळण्याची विनंती केली होती. सानिया नेहवालने सर्वप्रथम हे आव्हान पूर्ण केले होते. यानंतर अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, विराट कोहली अशा अनेकांनी क्रीडामंत्र्यांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारले होते. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेही हे आव्हान स्वीकारत आपला एक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यात दीपिका धावतांना दिसली. मी फिटनेससाठी कमालीची पॅशनेट आहे आणि आजकाल माझे मला रनिंगच्या वेडाने पछाडले आहे, असे हा व्हिडिओ शेअर करताना दीपिकाने लिहिले. 

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा click here : 

आपला हा व्हिडिओ पाहून चाहते उत्साहित होतील, प्रेरित होतील, असा तिचा अंदाज होता. पण हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर झाले भलतेच. लोकांनी दीपिकाचा हा फिटनेस व्हिडिओ पाहिला आणि दीपिकाला ट्रोल करणे सुरु केले़. कारण काय, तर दीपिकाचा हा व्हिडिओ दोन आठवडे जुना होता. लोकांना हे कळले आणि त्यांनी दीपिकाला चांगलेच फैलावर घेतले. दीपिका तुझा हा व्हिडिओ दोन आठवडे जुना आहे. आम्ही तुझ्याकडून नवे काही अपेक्षित करतो, असे एका युजर्सने दीपिकाला सुनावले. एका युजरने तर दीपिकाचा चांगलाच क्लास घेतला. चॅलेंज स्वीकारण्याच्या नावावर ही शुद्ध फसवणूक आहे. दोन आठवडे जुना व्हिडिओ शेअर करून तुला काय संदेश द्यायचायं दीपिका, असे या युजरने लिहिले. दीपिकाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण एक मात्र खरे, लोकांना फिटनेसबाबत जागृत करण्याच्या नादात दीपिकाचे चांगलेच हसू झाले. दीपिका यापासून काय धडा घेते, ते बघूच. 
 

Web Title: Deepika Padukone took a fitness challenge and made herself smile !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.