दीपिका पादुकोण शाहिद कपूरला म्हणाली,‘आय लव्ह यू?’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 12:23 IST2017-01-17T12:23:16+5:302017-01-17T12:23:16+5:30
शीर्षक वाचून गोंधळून जाऊ नका. तुम्ही वाचताय ते अगदी खरंय. ‘बॉलिवूडची मस्तानी’ दीपिका पादुकोण ही चक्क शाहिद कपूरला म्हणाली, ...
.jpg)
दीपिका पादुकोण शाहिद कपूरला म्हणाली,‘आय लव्ह यू?’
श र्षक वाचून गोंधळून जाऊ नका. तुम्ही वाचताय ते अगदी खरंय. ‘बॉलिवूडची मस्तानी’ दीपिका पादुकोण ही चक्क शाहिद कपूरला म्हणाली, ‘आय लव्ह यू, शाहिद!’ बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबतच्या तिच्या नात्याला तिने कायमचा ‘बाय बाय’ ठोकला की काय? असे तुम्हाला वाटत असेल. तर तुम्ही चुकताय. कुठलाही निष्कर्ष काढण्याअगोदर तुम्हाला हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे की, ती शाहिद कपूरला असे का म्हणाली? त्याचं झालं असं की, अलीकडेच झालेल्या ‘फिल्मफेअर अॅवॉर्ड्स’ मध्ये शाहिद कपूरला ‘उडता पंजाब’ चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयामुळे (क्रिटिक्स चॉईसनुसार) ‘उत्कृष्ट अभिनेता’ हा अॅवॉर्ड मिळाला. त्यामुळे तिने तिचा ‘पद्मावती’ सहकलाकार असलेल्या शाहिदचे सोशल मीडियावर त्याला बेस्ट विशेस देत कौतुक केले. तिने इन्स्टाग्रामवर शाहिदचा ट्रॉफी हातात घेतलेल्या फोटोला ‘अभिनंदन, शाहिद. आय लव्ह यू.’ असे कॅप्शन दिले.
![]()
‘बॉलिवूडचा बाजीराव’ रणवीर सिंग आणि ‘बॉलिवूडची मस्तानी’ दीपिका पादुकोण यांचं रिलेशन ‘बी टाऊन’ पासून लपून राहिलेलं नाही. त्यांच्या प्रेमाला अलीकडेच भारतात आलेल्या हॉलिवूड अभिनेता विन डिझेल यानेही दुजोरा दिला होता. त्याने रणवीरला दीपिकाचा बॉयफ्रेंड म्हणून संबोधले होते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटात शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे तिघेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे त्या तिघांमध्येही चांगली बाँण्डिंग निर्माण झाली आहे. शाहिदला मिळालेल्या दीपिकाच्या या प्रतिक्रियेमुळे तो सुखावला. मात्र, रणवीर सिंगच्या रागाचा त्याला सामना करावा लागतो की काय? अशी भीती शाहिदच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली. तिने केलेल्या कमेंटला मग शाहिदने रिप्लाय केला की,‘मी तुझे आभार मानतो आणि तेच प्रेम आणि विश्वास तुझ्याबद्दलही व्यक्त करतो.’
![]()
तुम्हाला हे आठवतेय का? दीपिका पादुकोणच्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी ट्रेलर पाहून सर्वप्रथम त्यावर क मेंट करणारा शाहिद कपूर हा पहिलाच अभिनेता होता. त्याने ‘ तुझ्यामुळे आम्हाला स्वत:चा खुप अभिमान वाटतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि हॉलिवूडपटांमध्ये बॉलिवूडचा झेंडा तुझ्यामुळे आपल्याला फडकावता आला.’ तसेच दीपिकाच्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ या स्पेशल स्क्रिनिंगला देखील शाहिद उपस्थित होता.