दीपिका पादुकोण अभिनया व्यतिरिक्त या गोष्टीत रमते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 14:52 IST2018-02-22T09:21:58+5:302018-02-22T14:52:03+5:30

चित्रपट पद्मावतमधील राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका पादुकोणचे तिच्या अभिनयाबद्दल प्रेक्षकांनी कौतुक केले. दीपिका एक सुंदर अभिनेत्री बरोबर एक ...

Deepika Padukone plays in addition to acting | दीपिका पादुकोण अभिनया व्यतिरिक्त या गोष्टीत रमते

दीपिका पादुकोण अभिनया व्यतिरिक्त या गोष्टीत रमते

त्रपट पद्मावतमधील राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका पादुकोणचे तिच्या अभिनयाबद्दल प्रेक्षकांनी कौतुक केले. दीपिका एक सुंदर अभिनेत्री बरोबर एक सुंदर कलाकार सुद्धा आहे. तिने तिच्या आतपर्यंत केलेल्या अभिनयातून दाखवून दिले आहे पण नुकतेच दीपिका ने ती अभिनया व्यतिरिक्त हे काम सुद्धा करते  हे तिने एक पोस्ट शेअर करून लोकांना सांगितले  ते पाहून असे वाटते आहे की दीपिका आता चित्रपटा त अभिनया बरोबर किंवा त्याव्यतिरिक्त अजून काही करण्याची तयारी करत आहे. सविस्तर बातमी अशी की दीपिका ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला आहे त्या फोटो मध्ये एका पानावर तिने लिहलेली कविता आहे ज्याचे शीर्षक 'आय एम' असे आहे ह्या फोटो खाली तिने  "सातवीत असताना कविता लिहिण्याचा मी केलेला प्रयत्न" असे लिहले आहे. दीपिकाच्या या फोटोला तिच्या बॉयफ्रेंड रणवीर सिंगने सुद्धा लाईक केले आहे. 

सूत्रानुसार कदाचित दीपिका तिच्या पोस्टवर मिळालेल्या तिच्या फॅन्स च्या प्रतिक्रीया पाहून अभिनयाबरोबर ब्लॉग लिहायला सुद्धा सुरवात करेल किंवा कविता सुद्धा पुन्हा लिहायला सुरुवात करेल.बाकी दीपिका ने लिहलेली कविता खूप छान लिहिली आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका आणि रणवीर सिंगच्या लग्नाची चर्चा आहे. विराट कोहली व अनुष्का शर्मासारखेच हे दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या विचारात आहेत.  या डेस्टिनेशन वेडिंगची सध्या जोरात चर्चा आहे.पण रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. सूत्रांच्या मते, लग्नानंतर दोन रिसेप्शन होतील. दीपिकाचे कुटुंब बेंगळुरूत राहते. त्यामुळे दीपिकाच्या नातेवाईकांसाठी एक रिसेप्शन बेंगळुरूत होईल.तर रणवीरचे नातेवाईक व बॉलिवूडच्या मित्रांसाठी दुसरे रिसेप्शन मुंबईत दिले जाईल. विराट व अनुष्काने आपल्या लग्नासाठी इटलीची निवड केली होती. आता दीपिका व रणवीर कुठल्या देशाची व ठिकाणाची निवड करतात, ते बघूच. यापूर्वी दीपिका व रणवीरच्या अतिशय जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दीपिका व रणवीरने लग्नाचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली होती.

Web Title: Deepika Padukone plays in addition to acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.