‘ईएमए’च्या रेड कार्पेटवर दीपिकाचा जलवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 14:16 IST2016-11-07T12:47:02+5:302016-11-07T14:16:14+5:30
हॉलंडच्या रॉटरडॅममध्ये रविवारी रात्री झालेल्या युरोपियन म्युझिक अवार्डच्या रेड कार्पेटवर दीपिका पादुकोण हिची एन्ट्री झाली आणि सगळ्यांच्याच्या हृदयाचे ठोके ...
.jpg)
‘ईएमए’च्या रेड कार्पेटवर दीपिकाचा जलवा!
ह लंडच्या रॉटरडॅममध्ये रविवारी रात्री झालेल्या युरोपियन म्युझिक अवार्डच्या रेड कार्पेटवर दीपिका पादुकोण हिची एन्ट्री झाली आणि सगळ्यांच्याच्या हृदयाचे ठोके चुकले. एका आगळ्या-वेगळ्या लूकमध्ये दीपिका रेड कार्पेटवर उतरली. डिझाईनर मोनिशा जयसिंहने डिझाईन केलेल्या काळ्या व हिरव्या रंगाच्या पोशाखात दीपिकाने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
![]()
मोनिश जयसिंहने हा तिचा ड्रेस सेलिब्रिटी स्टाईलिस्ट शालिना नाथानीसोबत मिळून तयार केला. साईड स्लिट असलेला लांब स्कर्ट, त्यावर बेल्ट, हिरवा बस्टियर आणि कानात लटकते झुमके या अवतारात दीपिका अतिशय सुंदर दिसत होती. या अवार्ड शोमध्ये दीपिकाने कॅनडाई गायक-गीतकार ‘दी वीकेंड’ला बेस्ट म्युझिक अवार्ड प्रदान केला. ‘वॅम्पायर डायरिज’ची स्टार नीना डोबरेब ही सुद्धा यावेळी तिच्यासोबत दिसली. यावेळी दीपिका व नीना एकत्र फोटोग्राफर्सला पोझ देताना दिसल्या.
![]()
![]()
दीपिकाचा ‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ झेंडर केज’ हा हॉलिवूडपट पुढीलवर्षी जानेवारीत रिलीज होत आहे. यात दीपिका विन डिजेलसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दीपिका सध्या बिझी आहे. दीपिका लवकरच ‘पद्मावती’मध्ये दिसणार आहे.
![]()
जगभरातील संगीतकार-गायकांचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात करण्यात येतो. म्युझिक इंडस्ट्रीमधील अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार असून जगभरात तो पाहिला जातो. मोठ-मोठे कलाकार या कार्यक्रमात परफॉर्म करतात.