दीपिकाला पती म्हणून हवा बडा स्टार??

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 17:23 IST2016-07-20T11:49:34+5:302016-07-20T17:23:29+5:30

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटासाठी दीपिका पदुकोण व रणवीर सिंह या दोघांचे नाव निश्चित झाले आणि ...

Deepika gets bigger star as husband? | दीपिकाला पती म्हणून हवा बडा स्टार??

दीपिकाला पती म्हणून हवा बडा स्टार??

जय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटासाठी दीपिका पदुकोण व रणवीर सिंह या दोघांचे नाव निश्चित झाले आणि एक वेगळीच अडचण निर्माण झाली. होय, ‘पद्मावती’त दीपिकाचा पती कोण बनणार? हा प्रश्न भन्साळींपुढे उभा ठाकला आहे. कारण एकीकडे कुठलाही मोठा स्टार पद्मावतीच्या पतीची भूमिका साकारायला तयार नाही आणि दुसरीकडे दीपिका कुठल्याही लहान कलाकारासोबत काम करण्यास राजी नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावतीचा पती राजा रतन सिंह याच्या भूमिकेसाठी  टीव्ही अ‍ॅक्टर विकी कौशलचे नाव फायनल झाले होते. मात्र दीपिकाने त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला. याचे एक कारण म्हणजे चित्रपटातील रोमान्सही आहे. दीपिका पदुकोण या चित्रपटात मेवाडची राणी पद्मावतीच्या मुख्य भूमिकेत आहे, तर रणवीर सिंग तिला जबरदस्ती प्राप्त करण्याची इर्षा असलेला सुलतान अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. निश्चितपणे रणवीरची भूमिका अतिशय दमदार आहे. त्यामुळेच कुठलाही  ‘ए ग्रेड’ हिरो पद्मावतीच्या पतीची भूमिका साकारायला तयार नाही. ही भूमिका काहीशी कमजोर असल्याचे ‘ए ग्रेड’ अभिनेत्यांना वाटते आहे. दुसरीकडे दीपिका लहान हिरोसोबत रोमॅन्टिक सीन द्यायला तयार नाही. सूत्रांचे मानाल तर, आवडीचा हिरो असेल तरच रोमॅन्टिक सीन देणार असे दीपिकाने स्पष्ट केले आहे. मग काय, भन्साळींची कमालीची गोची झालीय... 

Web Title: Deepika gets bigger star as husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.