कोरोनामुळे उपासमारीची वेळ आलेल्या इंडस्ट्रीतील लोकांना मदत करणार ही संस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 04:40 PM2020-03-23T16:40:36+5:302020-03-23T16:43:04+5:30

कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Coronavirus: Producers Guild of India sets up relief fund for daily wagers affected by production halt PSC | कोरोनामुळे उपासमारीची वेळ आलेल्या इंडस्ट्रीतील लोकांना मदत करणार ही संस्था

कोरोनामुळे उपासमारीची वेळ आलेल्या इंडस्ट्रीतील लोकांना मदत करणार ही संस्था

googlenewsNext
ठळक मुद्देसिद्धार्थ रॉय कपूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सध्या भारतात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे रोजंदारीवर काम करत असलेल्या इंडस्ट्रीतील लोकांवर अतिशय वाईट काळ आला आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही पैसे जमा करण्याचे ठरवले आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील ज्युनिअर आर्टिस्टवर उपासमारीची वेळ आली आहे. स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, प्रोडक्शनशी संबंधित लोकांची सध्या अतिशय भयाण स्थिती आहे. त्यांना मदत करण्यासाठी आता प्रोड्यसुर गिल्ड ऑफ इंडिया पुढे आली आहे.

प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सध्या भारतात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे रोजंदारीवर काम करत असलेल्या इंडस्ट्रीतील लोकांवर अतिशय वाईट काळ आला आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही पैसे जमा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे  मी इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या सगळ्या लोकांना आवाहन करत आहे की, त्यांनी देखील यासाठी आर्थिक मदत करावी, जेणेकरून सगळ्यांना जास्तीत जास्त मदत करणे शक्य होईल... कोणालाही  या चांगल्या कामासाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी support@producersguildindia.com या इमेल आयडीवर संपर्क साधावा.

या सगळ्याच लोकांना दिवसभर काम केल्यानंतर दिवसाचे पैसे मिळतात. पण सध्या चित्रीकरणच बंद असल्याने त्यांना काम मिळत नाहीये. त्यांच्या घरात शिजवायला अन्न देखील नसल्याने काही दिवसांपूर्वी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईजने आणि गिल्ड प्रोड्यूसर असोसिएशनने मिळून या लोकांना दैनंदिन वापरात लागणारे अत्यावश्यक धान्याचे वाटप केले होते. 5000 कर्मचाऱ्यांना गोरेगावमधील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये धान्याचे वाटप केले गेले होते. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Coronavirus: Producers Guild of India sets up relief fund for daily wagers affected by production halt PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.