Corona Effect: अरे याला कोणीतरी आवरा रे, लोकांना धीर देण्याऐवजी भरवतोय धडकी,कोण आहे हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 02:43 PM2020-03-23T14:43:44+5:302020-03-23T14:44:38+5:30

सेलिब्रटीमंडळी जनतेला आवाहन करत कशा रितीने खबरदारी पाळली पाहिजे अशा सुचना करत आहेत

Corona Effect: This is what will happen when you will be out of quarantine'; Ranveer Singh shared a dangerous look-SRJ | Corona Effect: अरे याला कोणीतरी आवरा रे, लोकांना धीर देण्याऐवजी भरवतोय धडकी,कोण आहे हा?

Corona Effect: अरे याला कोणीतरी आवरा रे, लोकांना धीर देण्याऐवजी भरवतोय धडकी,कोण आहे हा?

googlenewsNext

नेहमीच चर्चेत राहण्यासाठी  बॉलीवुडमध्ये विविध फंडे अवलंबले जातात. सध्या कनिका कपूर सोडलं तर कोणाचीच चर्चा होत नाही. त्यातही काही अतरंगी सेलिब्रेटी चर्चेत राहण्यासाठी आयडीयाची कल्पना लढवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आघाडीवर आहे बॉलीवुडचा बाजीराव रणवीर सिंह.


एकीकडे संपूर्ण देशात कोरोनापासून कसा वचाव केला जाईल यावरच सर्व लक्ष लागले असताना बॉलिवूडचा रणवीर सिंहला मात्र अतरंगी गोष्टी सुचत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमीच त्याच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलने तो सा-यांचे लक्ष वेधून घेत असतो. नेहमीप्रमाणे आताही रणवीरने सा-यांचे लक्ष वेधले आहे. मात्र आता तर त्याने कळसच गाठला आहे. होय, रणवीरने असा फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शनही दिली आहे की, ''क्वॉरंटाईन पिरयड नंतर होणारी त्याची अवस्था !''. 

एकीकडे सेलिब्रटीमंडळी जनतेला आवाहन करत कशा रितीने खबरदारी पाळली पाहिजे अशा सुचना करत आहेत तर दुसरीकडे रणवीरला मात्र अशा उलट सुलट क्लृप्त्या सुचत असल्याचे पाहायला मिळत आहे.  


विशेष म्हणजे रणवीरने दिपिकासह इटली येथेच सात फेरे घेतेले होते. इटलीतील लेक कोमो  इथं दीपिका आणि रणवीर यांचं शुभमंगल पार पडलं. आज त्याच देशाची कोरोनामुळे अतिशय बिकट अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेटीझन्सनाही कोरोना आणि रणवीरसह संबंध जुळवत फनी मिम्स व्हायरल करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. तुर्तास रणवीरने वेळेचे भाण न बाळगता अशातही तो पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा हेच सिद्ध केले आहे.
 

Web Title: Corona Effect: This is what will happen when you will be out of quarantine'; Ranveer Singh shared a dangerous look-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.