आता तर मी फाटके कपडेच घालणार...! ‘कटप्पा’ची लेक का संतापली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 12:08 PM2021-03-21T12:08:26+5:302021-03-21T12:10:25+5:30

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भडकली दिव्या सत्यराज

cm tirath singh rawat ripped jeans controversy kattappa satyaraj daughter divya angry reactions | आता तर मी फाटके कपडेच घालणार...! ‘कटप्पा’ची लेक का संतापली?

आता तर मी फाटके कपडेच घालणार...! ‘कटप्पा’ची लेक का संतापली?

googlenewsNext
ठळक मुद्दे याआधी अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा हिनेही तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याची निंदा केली होती.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असताना आता साऊथ इंडस्ट्रीच्या सेलिब्रिटींनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता बाहुबली फेम कटप्पा अर्थात अभिनेता सत्यराज यांची मुलगी दिव्या सत्यराज हिने सुद्धा या वादात उडी घेतली आहे. आता तर मी फाटके कपडेच घालणार, तुम्हाला करायचे ते करा, असे दिव्याने म्हटले आहे.

या मुद्यावर दिव्याने दिलेले स्टेटमेंट प्रचंड व्हायरल होतेय. ‘आम्ही कोणते कपडे घालायचे, कोणते नाही, ते महिलांना शिकवू नका. मी तर फाटकी जीन्सच घालणार,’ असे दिव्या तिच्या पोस्टमध्ये म्हणाली. तिचा राग इथेच शांत झाला नाही तर यासोबत तिने रिप्ड जीन्समधील स्वत:चे काही फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. महिलांना त्यांच्या कपड्यांवरून जज करू नका, असा संदेश तिने या फोटोंच्या माध्यमातून दिला आहे. नेते लोक किंवा राजकारणात मोठमोठी स्वप्न पाहणारे कधीही फाटक्या जीन्समधील फोटो शेअर करणार नाहीत. पण मी कोणासाठीही बदलणार नाही. मी जशी आहे, तशीच राहील, असेही तिने म्हटले आहे.

 याआधी अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा हिनेही तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याची निंदा केली होती. शिवाय रिप्ड जीन्स घातलेला एक फोटो शेअर केला होता. ‘ आमचे कपडे बदलण्याआधी आपले विचार बदला. मी रिप्ड जीन्स घालणार आणि अभिमानाने मिरवणार,’ असे नव्याने तिच्या इन्स्टास्टोरी पोस्टमध्ये लिहिले होते.
 एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले होते. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असे रावत म्हणाले होते.  

Web Title: cm tirath singh rawat ripped jeans controversy kattappa satyaraj daughter divya angry reactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.