फोटोशूटमध्ये स्टनिंग अंदाजात बघावयास मिळाली चंकी पांडेची पुतणी, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 19:24 IST2018-04-08T13:54:34+5:302018-04-08T19:24:43+5:30

अभिनेता चंकी पांडेच्या पुतणीने नुकतेच फोटोशूट केले असून, त्यामध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. ती या फोटोशूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Chunky Pandey's statue found in photoshoot stuning, see video! | फोटोशूटमध्ये स्टनिंग अंदाजात बघावयास मिळाली चंकी पांडेची पुतणी, पाहा व्हिडीओ!

फोटोशूटमध्ये स्टनिंग अंदाजात बघावयास मिळाली चंकी पांडेची पुतणी, पाहा व्हिडीओ!

िनेता चंकी पांडेची पुतणी अलाना पांडे हिने नुकतेच एक स्टनिंग फोटोशूट केले. त्यामध्ये ती ट्रेडिशनल लूकमध्ये बघावयास मिळत होती. अलानाने तिच्या इन्स्टाग्रामवर पेजवर या फोटोशूटचे बरेचसे व्हिडीओ आणि फोटोज् अपलोड केले. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. अलानाचे हे फोटोशूट पाहता तिची ही बॉलिवूड तयारी तर नसावी ना? असा प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. अलानाचे वय २२ वर्ष इतके आहे. ती चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी आहे. 
 

दरम्यान, अलानाची गणती इंडस्ट्रीतील पॉप्युलर स्टार डॉटर्समध्ये केली जाते. सध्या अलाना लंडन येथे फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे. फॅशन ब्रॅण्ड फाल्गुनी अ‍ॅण्ड शीन पिकॉकसाठी केलेले हे फोटोशूट बघून असे वाटते की, फॅशन इंडस्ट्रीनंतर लवकरच अलाना फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार आहे. 
 

अलानाची आई डिने पांडे सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर आहे. ती बिपाशा बसूची जवळची मैत्रीण आणि फिटनेस ट्रेनरही आहे. तर अलानाचे वडील चिक्की पांडे मुंबई बेस्ड बिझनेसमॅन आहेत. तसेच ते अक्षरा फाउंडेशन आॅफ आर्ट्स अ‍ॅण्ड लर्निंगचे को-फाउंडर आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून अंडर प्रिविलेज्ड मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जाते. चिक्की-डिनेला एक मुलगाही आहे. भाऊ अहान पांडेसोबत अलाना पांडे नेहमीच बॉलिवूड इव्हेंट्समध्ये बघावयास मिळत असते. 

Web Title: Chunky Pandey's statue found in photoshoot stuning, see video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.