लंडनमध्ये कॅटरिनाचा ‘फॅमिली टाईम’

By Admin | Published: December 30, 2016 03:14 AM2016-12-30T03:14:45+5:302016-12-30T03:14:45+5:30

चित्रपटासाठी शूटिंग करण्यात कलाकार नेहमी बिझी असतात. शूटिंग करताना त्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे याचा विसर पडतो. घरच्यांची कितीही आठवण आली तरी त्यांना

Catherine's 'Family Time' in London | लंडनमध्ये कॅटरिनाचा ‘फॅमिली टाईम’

लंडनमध्ये कॅटरिनाचा ‘फॅमिली टाईम’

चित्रपटासाठी शूटिंग करण्यात कलाकार नेहमी बिझी असतात. शूटिंग करताना त्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे याचा विसर पडतो. घरच्यांची कितीही आठवण आली तरी त्यांना शूटिंग सोडून कुठेच जाता येत नाही. बिझी शेड्यूलमधून वेळ काढून कॅटरिना कैफ ही लंडनला तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला गेली आहे. तिथेच न्यू इअरची पार्टी आणि प्लॅनिंग करण्यात आता ती व्यस्त झाली आहे. तिने तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कॅटरिना कैफ ही अलीकडेच ‘कॉफी विद करण’ या रिअ‍ॅलिटी शोवर अनुष्का शर्मा हिच्यासोबत आली होती. गप्पांच्या मैफलीत अनेक गमतीजमती समोर आल्या. कॅटरिना कैफचा आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस ७ एप्रिल २०१७ ला रिलीज होणार आहे.

Web Title: Catherine's 'Family Time' in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.