​दीपिका पादुकोणच्या तालावर कॅप्टन कुल महेन्द्र सिंह धोनीचा ‘धन धना धन’ डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 15:49 IST2018-04-08T10:19:36+5:302018-04-08T15:49:36+5:30

दीपिका पादुकोण आणि कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. होय, आयपीएलच्या ...

Captain Kuldeep Padukone on the lock of Captain Mahendra Singh Dhoni's 'Dhan Dhana Dhan' Dance! | ​दीपिका पादुकोणच्या तालावर कॅप्टन कुल महेन्द्र सिंह धोनीचा ‘धन धना धन’ डान्स!

​दीपिका पादुकोणच्या तालावर कॅप्टन कुल महेन्द्र सिंह धोनीचा ‘धन धना धन’ डान्स!

पिका पादुकोण आणि कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. होय, आयपीएलच्या ‘धन धना धन’ या अँथम साँगवर चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत दीपिका धम्माल डान्स करताना या व्हिडिओत दिसते आहे. महेन्द्र सिंह धोनी, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या हे सर्व खेळाडूही दीपिकाच्या तालावर नाचत असल्याचे यात दिसतेय. पण या व्हिडिओचा संपूर्ण फोकस धोनी आणि दीपिकावर आहे. आता असे का, यामागचा सगळा इतिहास तुम्हाला ठाऊक आहेच. आज महेन्द्र सिंह धोनी त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असला तरी एकेकाळी त्याचे नाव दीपिकासोबत जोडले गेले होते. यात किती तथ्य ते आम्हाला ठाऊक नाही. पण एकेकाळी या कपलच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात होत्या. धोनीला डेट करत असतानांच दीपिका युवराज सिंग याच्याही जवळ गेली होती. हे पाहून नंतर धोनीने स्वत:हून दीपिकाशी सगळे संबंध तोडले, असे मानले जाते.
वेगाने व्हायरल होत असलेल्या आयपीएल कमर्शिअलमध्ये दीपिकाने गोल्डन ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे. काल ७ एप्रिलला आयपीएल सोहळा सुरू झाला. या सोहळ्याच्या उद्घाटन समारंभात हृतिक रोशन, वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस, तमन्ना भाटिया असे अनेक बॉलिवूड स्टार्स परफॉर्मन्स करताना दिसले. रणवीर सिंग हा सुद्धा या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स देणार होता. मात्र शूटींगदरम्यान खांद्याला दुखापत झाल्याने ऐनवेळी त्याने हा शो रद्द केला होता. त्याची जागा हृतिक रोशनने घेतली.
अलीकडे दीपिका व रणवीरचा ‘पद्मावत’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने रेकॉर्ड तोड कमाई केली. ‘पद्मावत’नंतर दीपिका विशाल भारद्वाज यांच्या‘सपना दीदी’ या चित्रपटात दिसणार आहे. यात दीपिकाच्या अपोझिट इरफान खानचे नाव फायनल झाले होते. पण या चित्रपटाचे शूटींग सुरू होण्याआधीच इरफानच्या आजाराची बातमी आली. न्युरो इंडोक्राईन ट्युमर या दुर्धर आजाराने इरफानला ग्रासले आहे. सध्या विदेशात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ‘सपना दीदी’चे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे.