रस्त्यावर पापड विकताना दिसला बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार; ओळखणेही झाले मुश्किल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 17:49 IST2018-02-20T12:19:29+5:302018-02-20T17:49:29+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये तो चक्क रस्त्यावर पापड विकताना बघावयास मिळत आहे. ...

Bollywood's 'Ha' superstar seen selling pad on the road; Even hard to identify! | रस्त्यावर पापड विकताना दिसला बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार; ओळखणेही झाले मुश्किल!

रस्त्यावर पापड विकताना दिसला बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार; ओळखणेही झाले मुश्किल!

लिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये तो चक्क रस्त्यावर पापड विकताना बघावयास मिळत आहे. हे फोटो काही दिवसांपूर्वी जयपूर येथून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या सांभार रोडवर क्लिक करण्यात आले आहेत. हृतिक येथे त्याच्या आगामी ‘सुपर-३०’  या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात हृतिक ‘सुपर-३०’चे संस्थापक आनंदकुमार यांची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. हृतिक त्याच्या भूमिकेत असा काही रममाण झाला आहे की, शूटिंगदरम्यान त्याला ओळखणेही मुश्किल होत आहे. 



काही दिवसांपूर्वीच हृतिकने त्याच्या ‘सुपर ३०’चा फर्स्ट लूक त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. दाढी आणि केस वाढलेल्या अंदाजात हृतिकचा नवा लूक कमालीचा दिसत होता. हृतिकने त्याच्या लूकचा फोटो शेअर करताना त्याच्याखाली एक कॅप्शन दिले होते. दरम्यान, सुपर ३० हा चित्रपट पाटणाच्या आनंदकुमार याच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी १९९२ मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती. 



ज्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे, ते आनंदकुमार बिहार येथे ‘सुपर ३०’   नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंदकुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत, परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंदकुमार संधी देतात.

Web Title: Bollywood's 'Ha' superstar seen selling pad on the road; Even hard to identify!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.