‘मशीन’ ठरला बॉलिवूडमधील सर्वाधिक फ्लॉप चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 21:49 IST2017-03-24T16:19:00+5:302017-03-24T21:49:00+5:30

बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट हिट किंवा फ्लॉप होणे यात काही नवीन नाही. कारण काही चित्रपट ब्लॉकबस्टर म्हणून पुढे येतात, तर ...

Bollywood's biggest flop movie? | ‘मशीन’ ठरला बॉलिवूडमधील सर्वाधिक फ्लॉप चित्रपट?

‘मशीन’ ठरला बॉलिवूडमधील सर्वाधिक फ्लॉप चित्रपट?

लिवूडमध्ये एखादा चित्रपट हिट किंवा फ्लॉप होणे यात काही नवीन नाही. कारण काही चित्रपट ब्लॉकबस्टर म्हणून पुढे येतात, तर काही बॉक्स आॅफिसवर असे काही आपटतात की, चित्रपटाचा खर्चही निघणे अवघड असते. अशीच काहीशी स्थिती ‘मशीन’ या चित्रपटाविषयी झाली आहे. अब्बास-मस्तान यासारख्या अनुभवी दिग्दर्शकांचा मशीन हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर असा काही आपटला की, कदाचित आतापर्यंत बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक फ्लॉप म्हणून या चित्रपटाचा उल्लेख केला जाईल. 

१७ मार्च रोजी रिलीज झालेला हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये आठवडाभरदेखील टिकला नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या जुहू येथील एका पीव्हीआरमधून आलेल्या माहितीनुसार केवळ एकच व्यक्ती हा चित्रपट बघण्यासाठी सिनेमागृहात पोहोचली होती. दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सैफ अली खान स्टारर रेस, रेस-२, अजनबी, अक्षय कुमार-प्रियंका चोपडा स्टारर ऐतराज, हमराज आणि शाहरूख खान स्टारर बादशाह यासारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. 

मशीनची निर्मिती करून अब्बास-मस्तान यांनी त्यांच्या इमेजलाच धक्का पोहोचविला आहे. ‘मशीन’ या चित्रपटातून अब्बास बर्मावाला यांनी मुलगा मुस्तफा याला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहे. चित्रपटाची कथा एक थ्रिलर लव्ह स्टोरी आहे. मुस्तफासोबत कियारा आडवाणी दिसत असून, प्रेक्षकांनी या दोघानाही सपशेल नाकारले आहे. बॉलिवूडमध्ये अनेक स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर्सला स्टार बनविणारे अब्बास-मस्तान या जोडीला मात्र मुलाला स्टार बनविण्यात अपयश आले आहे. ‘मशीन’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी २६ कोटी रुपयांचा खर्च आला आहे; मात्र या चित्रपटाने केवळ दोन कोटी रुपयांचीच कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या नावे सर्वाधिक फ्लॉपच्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. 

Web Title: Bollywood's biggest flop movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.