Bollywood : 'या' सुपरहिट जोड्यांनी दिले फ्लॉप चित्रपट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 17:06 IST2018-03-22T11:36:19+5:302018-03-22T17:06:19+5:30
-रवींद्र मोरे आपला चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी दिग्दर्शक, निर्मात्याबरोबरच चित्रपटातील अभिनेताही कसोशिने प्रयत्न करत असतात. चित्रपटाची स्क्रीप्टपासून तर त्यातील ...

Bollywood : 'या' सुपरहिट जोड्यांनी दिले फ्लॉप चित्रपट !
आपला चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी दिग्दर्शक, निर्मात्याबरोबरच चित्रपटातील अभिनेताही कसोशिने प्रयत्न करत असतात. चित्रपटाची स्क्रीप्टपासून तर त्यातील गाणे, लोकेशन, शिवाय अभिनेता आणि अभिनेत्रीची योग्य जोडी या गोष्टींवर अधिक भर दिला जातो. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या दमदार परफॉर्म्समुळे सुपरहिट ठरले आहेत. मात्र अशाही काही सुपरहिट जोड्या आहेत ज्यांनी दर्शकांची घोर निराशा केली आहे, म्हणजेच त्यांनी फ्लॉप चित्रपट दिले आहेत. जाणून घेऊया अशा जोड्यांबाबत...
* सैफ अली खान- ट्विंकल खन्ना
सैफने बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. पण त्यापैकी काहींसोबत त्याची जोडी हिट ठरली तर काहींसोबत मात्र जोडी शोभून दिसली नाही. सैफने ट्विंकल खन्नासोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले होते. पण दोघांची जोडी प्रेक्षकांना भावली नाही. या दोघांनी आतापर्यंत 'दिल तेरा दीवाना', 'ये है मुंबई मेरी जान' आणि 'लव के लिए कुछ भी करेगा' या चित्रपटांमध्ये काम केले. पण हे तिन्ही चित्रपट सुपरफ्लॉप ठरले होते.

* शाहरुख खान - रवीना टडंन
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमी उत्सुक असतात. मात्र रवीना टंडनसोबत शाहरुख खानला पाहते दर्शकांबरोबरच त्याच्या चाहत्यांनीही नकार दिला. म्हणजेच शाहरुख खान आणि रवीना टंडन यांची जोडीसुद्धा फ्लॉप ठरली. दोघांनी 'ये लम्हे जुदाई के' आणि 'जमाना दीवाना' या चित्रपटांमध्ये काम केले होते. पण चित्रपटांसोबत दोघांची जोडीसुद्धा फ्लॉप ठरली.

* संजय दत्त - अमिषा पटेल
बॉलिवूडचा डॅशिंग स्टार संजूबाबा अर्थात संजय दत्तने आजपर्यंत अनेक अभिनेत्र्यांसोबत काम करत सुपरहिट चित्रपट दिले आहेत, मात्र अमिषा पटेलसोबत संजूबाबा मात्र फ्लॉप ठरला. संजय दत्त आणि अमीषा पटेल यांची जोडीदेखील एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही. 'चतुर सिंह टू स्टार' आणि 'तथास्तु' या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. पण चित्रपट फ्लॉपच्या यादीत सामील झाले.

* गोविंदा - मनीषा कोईराला
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडचा हिरो म्हणून प्रसिद्धीस असलेल्या गोविंदाचे चित्रपट सर्वचजण आवूर्जन पाहत असे. मात्र गोविंदाला मनीषा कोईरालासोबत पाहणे जवळपास सर्वांनीच नाकारले. गोविंदा आणि मनीषा कोईराला यांनी 'अचानक' आणि 'महाराजा' या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. चित्रपट तर सुपरफ्लॉप ठरले, सोबतच त्यांची जोडीसुद्धा फ्लॉप ठरली.

* सलमान खान - मनीषा कोईराला
बॉलिवूडचा दबंग सलमान खान तर बॉलिवूडवर राज करत आहे. सुपरस्टारच्या यादील अव्वलस्थानी असणाºया सलमान खानसोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी काम केले आहे, बरेच चित्रपट सुपरहिटही ठरले आहेत. मात्र सलमान आणि मनीषा कोईरालाची जोडी दर्शकांनी नाकारली. सलमान खान आणि मनीषा कोयराला यांनी 'खामोशी: द म्यूजिकल', 'ये मंझधार' आणि 'संगदिल सनम' या चित्रपटांमध्ये काम केले होते. ही जोडीदेखील हिट चित्रपट देऊ शकली नाही.