चायनीज चित्रपटात काम करणारा हा बॉलीवूड मधील कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 09:54 IST2018-05-01T04:24:58+5:302018-05-01T09:54:58+5:30

हिना या पहिल्याच मालिकेने राहुल भट्टला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत त्याने समीर ही मुख्य भूमिका साकारली होती. ...

Bollywood artists who work in Chinese films | चायनीज चित्रपटात काम करणारा हा बॉलीवूड मधील कलाकार

चायनीज चित्रपटात काम करणारा हा बॉलीवूड मधील कलाकार

ना या पहिल्याच मालिकेने राहुल भट्टला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत त्याने समीर ही मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याची लोकप्रियता पाहाता त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्याने काही वर्षांसाठी अभिनयाला रामराम ठोकला. 
राहुल सध्या दास देव या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत असून त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्याने दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की तो एका चायनीज चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण चीन मध्येच झाले आहे. 
राहुल भट ट्रू हिरोज या चायनीज चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याला या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली हे खूपच रंजक आहे. अनुराग कश्यपच्या अग्ली या चित्रपटात राहुलने एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट कान्स फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आला होता. त्यावेळी एक समीक्षकांनी त्यांच्या चित्रपट समीक्षेमध्ये माझ्या अभिनयाचा उल्लेख केला होता. ट्रू हिरोज या चित्रपटाच्या टीम मधील काही मंडळींनी ही समीक्षा वाचली आणि माझ्याशी संपर्क साधला होता. या चित्रपटात मी एका भारतीय तरुणाचीच भूमिका साकारत आहे. या तरुणाला चीनमध्ये जाऊन एका गुंडाला एक चिप द्यायची असते आणि त्या बदल्यात त्याला पैसे मिळणार असतात. पण चीनला पोहोचल्यावर तो गुंड त्याच्याकडून चिप काढून घेतो आणि त्याला पैसे पण देत नाही. या सगळ्या परिस्थितीचा हा तरुण कसा सामना देतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या तरुणाची भूमिका मी साकारत असून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरिस प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी चीनला देखील जाणार आहे. तिथले लोक अधिक प्रोफेशनल असल्याचे मला जाणवले.
चीन मधील प्रेक्षकांना देखील त्याचे काम आवडेल आणि त्याच्या कामाची ते प्रशंसा करतील अशी राहुलला खात्री आहे. 

rahul bhat


Also Read : राहुल भट्ट सांगतोय, मी वाईट अभिनय करत असताना प्रेक्षकांनी घेतले होते डोक्यावर

Web Title: Bollywood artists who work in Chinese films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.