साउथच्या ‘या’ अभिनेत्रीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूड अभिनेत्रींची लागेल कसोटी; पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 15:33 IST2018-05-08T10:03:28+5:302018-05-08T15:33:28+5:30
सध्या साउथ चित्रपटाचा बॉलिवूडवर चांगलाच परिणाम दिसत आहे. कारण बडे-बडे स्टार्स साउथ चित्रपटांचा रिमेक बनवून बॉक्स आॅफिसवर कोट्यवधी रुपयांची ...

साउथच्या ‘या’ अभिनेत्रीच्या सुंदरतेपुढे बॉलिवूड अभिनेत्रींची लागेल कसोटी; पाहा फोटो!
स ्या साउथ चित्रपटाचा बॉलिवूडवर चांगलाच परिणाम दिसत आहे. कारण बडे-बडे स्टार्स साउथ चित्रपटांचा रिमेक बनवून बॉक्स आॅफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत. साउथच्या काही अभिनेत्रींनीदेखील आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमध्ये आग लावली आहे. आता पुन्हा एक साउथ अभिनेत्री बॉलिवूडच्या वाटेवर असून, तिच्या सौंदर्यापुढे एकही अभिनेत्री टिकू शकणार नाही असेच काहीसे चित्र दिसत आहे. ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती भारतातील नव्हे तर अमेरिकेची आहे. अमेरिकेच्या टेक्सास शहरात लहानाची मोठी झालेल्या या अभिनेत्रीने साउथमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
![]()
![]()
केवळ २१ वर्षे वय असलेल्या या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर साउथमध्ये अक्षरश: खळबळ उडवून दिली आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव अन्नु एमानुएल असे आहे. अन्नुचे सौंदर्य बघून तिच्या वयाचा अजिबातच अंदाज बांधता येत नाही. कारण ती खूपच सुंदर असल्याने तिचे नक्की वय काय असेल हे समजत नाही. अन्नुने लहानपणीच फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. आता ती अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये बघावयास मिळत आहे. तिने तेलगू, मल्याळम आणि तामिळ भाषेतील तब्बल आठ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली.
![]()
![]()
![]()
अन्नुने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात २०११ मध्ये ‘स्वपन संचारी’ या मल्याळम चित्रपटातून केली होती. यामध्ये तिने एका बालकलाकाराची भूमिका साकारली होती. यावर्षी अन्नुचे ‘शेलजा रेड्डी अलेडू’ आणि ‘अमर अकबर एंथनी’ असे दोन तेलगू चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अन्नुुला प्रोड्यूसर्स गिल्ड अवॉर्डमध्ये तेलगूमधील बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्डही मिळाला आहे. याच महिन्यात अन्नुचा ‘पेरू सूर्या’ जगभरात प्रदर्शित करण्यात आला. तिचा हा चित्रपट गेल्या ४ मे रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता अल्लू अर्जुन बघावयास मिळाला. अन्नुचा परिवार मूळचा केरळ येथील असून, तिचा जन्म अमेरिकेत झाला आहे.