छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात बॉलिूवडचा अभिनेता, फोटो पाहून चाहत्यांनाही आश्चर्यचा 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 04:03 PM2020-12-21T16:03:58+5:302020-12-22T12:24:11+5:30

लवकरच तो ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या सिनेमाचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे.

Bollywood actor r.madhavan share his photo in chhatrapati shivaji maharaj look | छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात बॉलिूवडचा अभिनेता, फोटो पाहून चाहत्यांनाही आश्चर्यचा 'दे धक्का'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात बॉलिूवडचा अभिनेता, फोटो पाहून चाहत्यांनाही आश्चर्यचा 'दे धक्का'

googlenewsNext

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. आर. माधवन सध्या त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आला आहे. आर. माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषातील स्वत:चा फोटो शेअर केला आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. माधवनच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.. विशेष म्हणजे या पेहराव माधवनला ओळखणं तसं अवघडं आहे. 

‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या सिनेमात माधवन झळकणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. मात्र आता आर. माधवन या सिनेमाचे दिग्दर्शन करत असल्याचे समजते आहे.

नंबी नारायणन हे इस्रोमधील एक शास्त्रज्ञ असून त्यांना १९९४मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. नंबी नारायणन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपट तमीळ, तेलगू, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नंबी यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे व या भूमिकेत आर. माधवनला पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Bollywood actor r.madhavan share his photo in chhatrapati shivaji maharaj look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.