​‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी काढला बॉडी पार्ट्सचा विमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 12:56 IST2017-03-26T07:22:18+5:302017-03-26T12:56:05+5:30

बॉलिवूडमध्ये  ट्रेन्ड येतात आणि जातात. बॉडी पार्ट्सचा म्हणजेच शरिरांच्या अवयवांचा विमा हाही असाच एक ट्रेन्ड. आधी हॉलिवूडमध्ये हा ट्रेन्ड ...

Body Parts Insurance 'by' Bollywood 'celebrity! | ​‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी काढला बॉडी पार्ट्सचा विमा!

​‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी काढला बॉडी पार्ट्सचा विमा!

ong>बॉलिवूडमध्ये  ट्रेन्ड येतात आणि जातात. बॉडी पार्ट्सचा म्हणजेच शरिरांच्या अवयवांचा विमा हाही असाच एक ट्रेन्ड. आधी हॉलिवूडमध्ये हा ट्रेन्ड आला. हॉलिवूड सिंगर जेनिफर लोपेज हिने आपल्या हिप्सचा  २७ मिलियन डॉलरचा विमा काढला आहे. अन्य एक हॉलिवूड सिंगर मायली साइरस हिने तिच्या जिभेचा १ मिलियन डॉलरचा तर बोल्ड अ‍ॅण्ड हॉट किम कर्दाशियनने तिच्या हिप्सचा २१ मिलियन डॉलरचा विमा काढला आहे. हॉलिवूड गायिका मॅडोना हिनेही तिच्या ब्रेस्टचा २ मिलियन डॉलरचा विमा काढला आहे. हॉलिवूडच्या धर्तीवर  बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीनींही आपल्या शरिराच्या वेगवेगळ्या भागांचा विमा केलेला आहे. यात बॉलिवूडच्या  लोकप्रीय अभिनेत्यांसोबतच अनेक लोकप्रीय अभिनेत्रींचा समावेश आहे. या विम्याची रक्कम १० कोटींपासून तर ५० कोटी रूपयांपर्यंत आहे. हे सेलिब्रिटी कोण? त्यावर एक नजर...

लता मंगेशकर



गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाचे सगळेच भोक्ते आहेत. लता मंगेशकर यांनी आपल्या गळ्याचा इन्श्योरन्स केला आहे. अर्थात हा विमा किती रकमेचा आहे, याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.

प्रियांका चोप्रा



बॉलिवूड ते हॉलिवूड अशी झेप घेणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने कुठल्या बॉडी पार्टचा विमा केला असेल? काही अंदाज बांधू शकता. होय, प्रियांकाने तिच्या स्माईलचा विमा केला आहे. प्रियांकाच्या ओठांवरील हास्याने अनेकांना वेड लावते. पण कुठल्याही व्यक्तिने सर्जरी करून तिच्यासारखे हसू ओठांवर आणालेच तर त्या व्यक्तिला त्याची किंमत चुकवावी लागणार आहे.

अमिताभ बच्चन



मेगास्टार अमिताभ बच्चन हे अभिनयासोबतच त्यांच्या दमदार आवाजासाठीही ओळखले जातात. याच आवाजाचे महत्त्व ओळखून अमिताभ यांनी आवाजाचा विमा केला आहे.

जॉन अब्राहम



बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहम याने कुठल्या भागाचा विमा केला असेल? काही अंदाज? जॉनने आपल्या हिप्सचा विमा काढला आहे. ‘दोस्ताना’ रिलीज झाल्यानंतर २०१० मध्ये जॉनने स्वत:च्या हिपचा १० कोटी रूपयांचा विमा काढला होता.

मल्लिका शेरावत



मल्लिका शेरावत हिने आपल्या संपूर्ण शरिराचा विमा केलेला आहे. या विम्याची रक्कम आहे, ५० कोटी रुपए. सन २००९ मध्ये मल्लिकाने हा विमा काढला होता.

नेहा धूपिया



अभिनेत्री नेहा धूपिया सध्या बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण नेहानेही जॉन अब्राहम याच्याप्रमाणे तिच्या हिप्सचा विमा केला आहे. अर्थात तिचा हा विमा किती रकमेचा आहे, हे अद्याप कळलेले नाही. अमेरिकेच्या एका इन्श्योरन्स कंपनीकडून तिने हा विमा काढला आहे. याच कंपनीकडून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज हिने विमा काढला आहे.  

राखी सावंत



कॉन्ट्रोव्हर्सी क्विन या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखीने तिच्या बे्रस्टचा विमा केला आहे. तिनेही विम्याच्या रकमेचा खुलासा केलेला नाही. मीडियाशी बोलताना राखीने या विम्याबद्दल माहिती दिली होती.

मिनीषा लांबा



राखी सावंत हिच्याप्रमाणेच अभिनेत्री मिनीषा लांबा हिनेही आपल्या ब्रेस्टचा विमा केलेला आहे. मिनीषाने तिच्या चेहºयाची प्लास्टिक सर्जरी केल्याचीही चर्चा होती. सध्या मिनीषा बॉलिवूडमध्ये कुठेच नाही. पण त्यावेळी तिचा हा विमा बराच चर्चेचा विषय ठरला होता.

सनी देओल



अभिनेता सनी देओल याने कशाचा विमा केला असेल? सनीने आपल्या ‘ढाई किलो’च्या हाताचा विमा काढला असेल, असेच तुम्हाला वाटेल. पण नाही. सनीनेदेखील अमिताभ यांच्याप्रमाणे स्वत:च्या आवाजाचा विमा काढला आहे.  

Web Title: Body Parts Insurance 'by' Bollywood 'celebrity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.