BIRTHDAY SPECIAL : झीनत अमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 10:03 IST2016-11-19T09:45:08+5:302016-11-19T10:03:41+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा ‘सेक्स सिम्बॉल’ अशी ओळख मिळवणारी अभिनेत्री झीनत अमान हिचा आज (१९ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. ‘हरे कृष्णा ...

BIRTHDAY SPECIAL : झीनत अमान
ह ंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा ‘सेक्स सिम्बॉल’ अशी ओळख मिळवणारी अभिनेत्री झीनत अमान हिचा आज (१९ नोव्हेंबर) वाढदिवस आहे.
‘हरे कृष्णा हरे राम’, ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. जाणून घेऊ यात झीनत बद्दल काही गोष्टी़:
* १९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमानने लॉस एंजलिमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते़ यानंतर मॉडेलिंग क्षेत्रातून तिनेआपल्या कारकिदीर्ची सुरुवात केली.
![]()
* १९७१ साली ओ.पी. राल्हन यांच्या ‘हलचल’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
![]()
* ८० च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या. त्यादरम्यानच्या काळात मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
![]()
* मात्र १९७९ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा होत्या. याचदरम्यान दोघांनी अब्दुल्ला या सिनेमात एकत्र काम केले होते. चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर झीनत दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली. त्यावेळी संजय यांनी फोनवरुन झीनतला गाणे शूट करण्यास सांगितले. मात्र व्यस्त शेड्यूल्डमुळे झीनतने नकार दिला. झीनतच्या नकारामुळे संजय भडकले त्यांनी झीनतला खूप बरेवाईट सुनावले. संजयचा फोन ठेवल्यावर घाबरुन झीनत त्यांच्या घरी गेली. त्यावेळी संजय फाईव्ह स्टोर हॉटेलमध्ये गेल्याचे झीनतला कळले. झीनत तेथे पोहोचली. एका मॅगॅझिनमध्ये आलेल्या वृत्तानुसार चिडलेल्या संजय खान यांनी रागात झीनत यांना मारहाण केली. यानंतर मात्र त्या दोघांचे नाते तुटले. त्यानंतर झीनतने मजहर खान यांच्याशी लग्न केले.
![]()
* राज कपूर यांच्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’मध्ये टॉपलेस सीन देऊन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. झीनतच्या बिकिनी पोजने तर सलग तीन दशके प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले होते.‘सत्यम् शिवम् सुंदरम्’मध्ये झीनतने पातळ साडीत स्वत:ला तर एक्सपोज केलेच होते, शिवाय शॉवर बाथ सीन देऊन त्याकाळात हॉटेस्ट अभिनेत्री होण्याचा मानही मिळवला होता. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’, ‘दी ग्रेट गँबलर’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘डॉन’, ‘अब्दुल्लाह’, ‘इंसाफ का तराजू’, ‘हीरा पन्ना’, ‘हरे राम हरे कृष्णा’, ‘प्रेम शास्त्र’ आणि ‘डाकू हसीना’ या सिनेमात तर झीनतने भरभरून एक्सपोज केले होते.
![]()
* करिअर यशोशिखरावर असताना खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक चढ उतार पाहावे लागले. ७० च्या दशकात झीनतची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकत होती.