Birthday Special​ : आईच्या एका निर्णयाने बदलले प्रियांका चोप्राचे आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 10:51 IST2017-07-18T05:21:04+5:302017-07-18T10:51:04+5:30

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा हिचा आज (१८ जुलै) वाढदिवस. प्रियांका आज ३५ वर्षांची झाली. प्रियांकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर ...

Birthday Special: Priyanka Chopra's life changed with her mother's decision! | Birthday Special​ : आईच्या एका निर्णयाने बदलले प्रियांका चोप्राचे आयुष्य!

Birthday Special​ : आईच्या एका निर्णयाने बदलले प्रियांका चोप्राचे आयुष्य!

ong>ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा हिचा आज (१८ जुलै) वाढदिवस. प्रियांका आज ३५ वर्षांची झाली. प्रियांकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. रिअल लाईफमध्ये एक यशस्वी अभिनेत्री, यशस्वी गायिका, यशस्वी निर्माती अशा वेगवेगळ्या भूमिकेत वावरणाºया प्रियांकाबद्दल बºयाच इंटरेस्टिंग गोष्टी कदाचितच तुम्हाला माहित असतील. पिग्गीच्या याच इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रियांका सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्टी साजरी करते आहे. या हॉलि-डेचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


प्रियांकाचा जन्म १८ जुलै १९८२मध्ये झारखंडच्या जमशेदपूर येथे झाला. तिचे वडिल पंजाबच्या अंबालाचे होते तर आई झारखंडची आहे. पिग्गीचे आई-वडिल दोघेही भारतीय लष्करात डॉक्टर होते.



१३ वर्षांची असतांनापासून प्रियांका अमेरिकेत आपल्या काकूसोबत राहिली. बोस्टनच्या  शाळेत तिने प्रवेश घेतला. पण शाळेत तिला वंशभेदाला सामोरे जावे लागले.  इथला प्रियांकाचा अनुभव बराच वाईट होता. या  अनुभवाबद्दल प्रियांका सांगते, ‘वयाच्या केवळ तेराव्या वर्षी यूएसला जाणे हा फार मोठा कल्चरल शॉक होता. मी कधीही कॅफेटेररियामध्ये जात नव्हते. कारण रांगेत कसे उभे राहावे, पैसे कसे भरावे, जेवण कसे करावे हे मला ठाऊक नव्हते. माझ्यात आत्मविश्वास नसल्यामुळे मी वेंडिंग मशीनमधून चिप्स खरेदी करायचे आणि टॉयलेटमध्ये बसून ते खात होते. बोस्टन शहरात तीन वर्षे मी अशीच काढली. बोस्टनमधून परतले तेव्हा शॉर्ट ड्रेस घालून आले. विमातनळावर माझा तो अवतार पाहून डॅड चांगलेच संतापले. यानंतर डॅडीने माझे सगळे जीन्स आणि शॉर्ट्स परत घेत मला बारा जोडी सलवार सूट विकत घेऊन दिलेत.



प्रियांका परदेशातून परतली, तेव्हा तिचे नातेवाईक तिला सावळी म्हणून चिडवायचे. यामुळे प्रियांका आत्मविश्वास गमावून बसली. खरे तर प्रियांकाला इंजिनिअर बनायचे होते. पण प्रियांकाच्या आईने एक निर्णय घेतला अन् त्या निर्णयाने  प्रियांकाचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. युनिव्हर्सिटीत पुढचे शिक्षण घेण्यासाठी प्रियांकाने जे पासपोर्ट साईज फोटो काढून घेतले  होते, त्यापैकी काही फोटो प्रियांकाच्या आईने कुणालाही न विचारता मिस इंडिया स्पधेर्साठी पाठवून दिले. या स्पर्धेसाठी प्रियांकाची निवडही झाली. या स्पर्धेत प्रियांका दुसरी रनरअप ठरली. मग मिस वर्ल्डचा ताज प्रियांकाने आपल्या नावावर केला. पुढे ती बॉलिवूडमध्ये आली आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारूपास आली.

 

 सन २००२ मध्ये तामिळ चित्रपट ‘थमिजहन’मधून अभिनयाची सुरुवात केली.  २००३ मध्ये सनी देओलच्या ‘द हिरो- लव स्टोरी आॅफ ए स्पाय’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कार मिळवाणाºया प्रियांकाने अभिनयाच्या आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत हॉलिवूडपर्यंत मजल मारली. २००४ मध्ये ‘ऐतराज’मधील निगेटीव्ह रोलने प्रियांकाला खरी ओळख दिली.  ‘डॉन’,‘कृष’ या चित्रपटानंतर ती बॉलिवूडच्या ए लिस्टमध्ये सामील झाली.



प्रियांका चोप्राचे नाव अनेकांशी जोडले गेले. असीम मर्चंट, अक्षय कुमार, हरमन बावेजा, शाहरूख खान व शाहिद कपूर आदींसोबत तिच्या रिलेशनशिपच्या वावड्या उठल्या. पण रिलेशनशिपऐवजी प्रियांकाने करिअरला महत्त्व दिले आणि सर्वांना मागे सोडत ती यशाच्या शिखरावर पोहोचली.

Web Title: Birthday Special: Priyanka Chopra's life changed with her mother's decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.