Birthday Special : लग्नाआधी श्रीदेवीने बोनी कपूरला बांधली होती राखी.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 12:39 IST2017-11-11T07:09:05+5:302017-11-11T12:39:05+5:30

मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई आणि वांटेड सारखे चित्रपट तयार करणारा बोनी कपूर आज आपला 64 वा वाढदिवस साजरा ...

Birthday Special: Prior to marriage, Sridevi had built Boney Kapoor for Rakhi .. Read Details | Birthday Special : लग्नाआधी श्रीदेवीने बोनी कपूरला बांधली होती राखी.. वाचा सविस्तर

Birthday Special : लग्नाआधी श्रीदेवीने बोनी कपूरला बांधली होती राखी.. वाचा सविस्तर

स्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई आणि वांटेड सारखे चित्रपट तयार करणारा बोनी कपूर आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करतो आहे. बोनी कपूरने 1980 मध्ये आपला पहिला चित्रपट तयार केला होता हम पांच नावाचा. बोनीने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले.  बोनी कपूरचे पहिले लग्न मोना शौरीबरोबर झाले होते. अर्जुन कपूर आणि अंशुलाच्या जन्मानंतर बोनीने मोना पासून घटस्फोट घेत श्रीदेवीशी लग्न केले. श्रीदेवी लग्नाच्या आधीचे प्रेग्नेंट होती अशी अनेक वर्ष चर्चा आहे. त्यामुळे घाईघाईत बोनीने 1996 साली लग्न केले. बोनी आणि श्रीदेवी हे बॉलिवूडमधले एक हिट कपल आहे. 

बोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला यांच्या लव्हस्टोरीमधला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगणार आहोत. बोनीने श्रीदेवीला प्रपोज केले होते त्यावेळी श्रीदेवी बोनीला भाव देत नव्हती. तेव्हा बोनी आपल्या लहान भावाला घेऊन मिस्टर इंडिया चित्रपट तयार करत होता. या चित्रपटात त्यांने श्रीदेवीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवीने मिस्टर इंडियामध्ये काम करण्यासाठी जास्त पैशांची मागणी केली. बोनी श्रीदेवीने मागितलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे देण्यासाठी तयार झाला.  हा चित्रपट तयार झाला आणि सुपरहिट झाला. याचदरम्यान श्रीदेवीची आई आजारी पडली आणि तिला उपचारासाठी अमेरिकेला न्यावे लागले. हा संपूर्ण खर्च बोनीने उचलला. बोनीच्या या स्वभावामुळे श्रीदेवी त्याच्या जवळ आली. पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.  

ALSO READ :  वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीचा घायाळ करणारा अंदाज पाहाच !

श्रीदेवीचे नाव अनेकांशी जोडण्यात आले होते. यातलेच एक नाव होते मिथुन चक्रवतीचे. 1984 मध्ये ‘जाग उठा इन्सान’च्या शूटींगदरम्यान श्रीदेवी व मिथुन यांचे प्रेम बहरले. मिथुन दा यांना श्रीदेवीशी लग्न करायचे होते. मात्र त्यासाठी मिथुन यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा, अशी श्रीदेवीची अट होती. तर श्रीदेवी आपल्याला धोका देते आहे असे मिथुन वाटत होते. या कारणामुळे मिथुनने श्रीदेवीला बोनी कपूरला राखी बांधायला लावली होती. मात्र ज्याला राखीला त्याच व्यक्तीसी नंतर श्रीदेवीने विवाह ही केलाय.  

Web Title: Birthday Special: Prior to marriage, Sridevi had built Boney Kapoor for Rakhi .. Read Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.