Kalki Koechlin Birthday: बालपणी लैंगिक शोषण, २ वर्षातच तुटलं लग्न, असं काही होतं कल्कीचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:19 PM2023-01-10T18:19:51+5:302023-01-10T18:21:45+5:30

वयाच्या ९व्या वर्षीच तिचे लैंगिक शोषण झाले होते. तिने आपल्या घरातील सदस्यांना याबाबत काहीच सांगितले नव्हते. असा खुलासा कल्किनं एका मुलाखतीत केला होता.

Birthday special kalki koechlin physically abused at the age of 9 told in an interview | Kalki Koechlin Birthday: बालपणी लैंगिक शोषण, २ वर्षातच तुटलं लग्न, असं काही होतं कल्कीचं आयुष्य

Kalki Koechlin Birthday: बालपणी लैंगिक शोषण, २ वर्षातच तुटलं लग्न, असं काही होतं कल्कीचं आयुष्य

googlenewsNext

आपल्या दमदार अभिनयाने आणि वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलिन. 2009 मध्ये 'देव डी' चित्रपटातून कल्कीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप(Anurag Kashyap) ने केले होते. कल्कीचा जन्म 10 जानेवारी 1984 रोजी (Kalki Koechlin Birth Date) झाला. कल्की आज आपला वाढदिवस साजरा करते आहे.  


कल्किचे करिअर
कल्कीचा चेहरा भारतीय नसल्यामुळे ती 'देव डी' चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती, असे म्हटले जाते.पण जेव्हा अनुरागने तिचं ऑडिशन पाहिली तेव्हा त्याने आपला विचार बदलला. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. कल्कीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर तिने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'ये जवानी है दिवानी', 'जिया और जिया', 'गली बॉय' सारख्या चित्रपटात काम केले. 'गोल्डफिश' असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

अनुराग कश्यपच्या पडली होती प्रेमात 
कल्कीने 30 एप्रिल 2011ला 'देव डी'चा दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ (Kalki Koechlin Anurag Kashyap Relationship) आले. त्यावेळी ती अनुरागच्या प्रेमात होती. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोन वर्षांतच दोघे वेगळे झाले. अनुरागचे हे दुसरे आणि कल्कीचे पहिले लग्न होते. घटस्फोटानंतरही दोघेही चांगले मित्र आहेत.

वयाच्या 9 व्या वर्षी झाले होते लैंगिक शोषण 
कल्कीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, वयाच्या ९व्या वर्षीच तिचे लैंगिक शोषण झाले होते. तिने आपल्या घरातील सदस्यांना याबाबत काहीच सांगितले नव्हते. एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक लेखिका देखील आहे. कल्कीचे आई-वडील  मूळचे फ्रेंच आहेत. तिचे वडील बिझनेसमन आहेत, तर अभिनेत्रीचे आजोबा आयफिल टॉवर आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे मुख्य अभियंता होते. कल्कीचे बालपण पुद्दुचेरी तसंच तमिळनाडूतील उटीमध्ये गेले.

Web Title: Birthday special kalki koechlin physically abused at the age of 9 told in an interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.