Birthday Special : डिम्पल कपाडियावर होते ऋषी कपूर यांचे प्रेम; पण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 11:10 IST2017-09-04T05:40:59+5:302017-09-04T11:10:59+5:30

ऋषी कपूर यांचा आज (४ सप्टेंबर) वाढदिवस. आजकाल ऋषी कपूर त्यांच्या कामापेक्षा वादांमुळे अधिक चर्चेत राहतात. सोशल मीडियावरील त्यांच्या ...

Birthday Special: Dimple Kapadia is the love of Rishi Kapoor; But .... | Birthday Special : डिम्पल कपाडियावर होते ऋषी कपूर यांचे प्रेम; पण....

Birthday Special : डिम्पल कपाडियावर होते ऋषी कपूर यांचे प्रेम; पण....

ी कपूर यांचा आज (४ सप्टेंबर) वाढदिवस. आजकाल ऋषी कपूर त्यांच्या कामापेक्षा वादांमुळे अधिक चर्चेत राहतात. सोशल मीडियावरील त्यांच्या अनेक कमेंट्स वादग्रस्त ठरल्या आहेत. यासाठी त्यांना बरेच ट्रोलही व्हावे लागलेय. वैयक्तिक आयुष्यातही ऋषी कपूर यांचे आयुष्य एकार्थाने वादळीच म्हणायला हवे.



ऋषी कपूर यांनी १९७० मध्ये आलेल्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून डेब्यू केला होता. यात त्यांनी वडिल राज कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी ऋषी कपूर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.



लीड हिरो म्हणून ‘बॉबी’ हा ऋषी कपूर यांना पहिला डेब्यू सिनेमा होता. यात त्यांच्यासोबत डिम्पल कपाडिया दिसली होती. डिम्पलचाही हा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा करता करता ऋषी कपूर डिम्पलवर भाळले होते. डिम्पलला प्रपोज करण्याची त्यांची इच्छा होती.  पण वडील राज कपूर यांच्या नकाराने त्यांनी त्यांच्या भावना कधीच व्यक्त केल्या नाहीत. त्यानंतर त्यांच्या जीवनात नीतू कपूर आल्या आणि डिम्पलला विसरत ऋषी कपूर यांचे अफेअर सुरु झाले. पण नीतू यांच्यासोबत लग्नानंतरही ऋषी कपूर अभिनेत्रींशी फ्लर्ट करण्याचा चान्स सोडत नसत.



ऋषी यांच्या जीवनात जेव्हा नीतू सिंह आल्या त्याच्यानंतरही ऋषी कपूर इतर अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करत असत. पण नीतूअगोदरही अभिनेत्री यास्मिनसोबत त्यांचे 5 वर्ष अफेअर होते. नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर ऋषी यांना डिम्पल आवडू लागली.  



नीतू सिंग यांनी एका मुलाखतीत ऋषी कपूरबदद्ल सांगितले होते. ते म्हणजे, ऋषी कपूर फार कडक  बॉयफ्रेन्ड होते. ते नीतू सिंगला रात्री ८.३० नंतर शूटिंग करण्याची परवानगी देत नसत. नीतू यांना ऋषी कपूर यांच्या अफेअरबाबत माहिती होते. ते जेव्हाही पकडले जात तेव्हा साफ नकार देत असत आणि नीतू त्यांच्या प्रत्येक शब्दाला भूलतं. कदाचित त्याचमुळे  ऋषी कपूर यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धोका दिल्यानंतरही ते कायम त्यांच्यासोबत राहिल्या. नीतू यांनी सांगितले की ते एकमेकांना डेट करत होते तेव्हाही ऋषी कपूर इतर अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करत असत. 



  ९० च्या दशकात दोघांमध्ये फार कडाक्याचे भांडण झाल्याची चर्चा होती. ऋषी यांचे दारूचे व्यसन प्रचंड वाढले होते.त्यातच त्यांचा चिडका स्वभाव. या भांडणानंतर नीतू यांनी त्यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केसही दाखल केल्याचे कळते. नीतू याबद्दलही बोलल्या होत्या. प्रत्येक विवाहीत जोडप्याच्या जीवनात अशी वेळ येते जेव्हा दोघे एकमेकांच्या विचारांशी सहमत नसतात. पण आम्ही दोघांनी मिळून ती परिस्थिती सांभाळली, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

ALSO READ : ऋषी कपूर यांनी पोस्ट केला मुलाचा न्यूड फोटो! पोलिसांत तक्रार दाखल!!

ऋषी कपूर व नीतू सिंह यांनी जवळपास १२ चित्रपटात सोबत काम केले आहे.   जहरीले इंसान ,  जिंदा दिल ,  खेल खेल में  ,  रफू चक्कर ,  कभी कभी ,  दूसरा आदमी ,  अमर अकबर एंथोनी ,  झूठा कही का ,  दुनिया मेरी जेब में ,  धन- दौलत  यांसारख्या अनेक चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली.

Web Title: Birthday Special: Dimple Kapadia is the love of Rishi Kapoor; But ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.