बिपाशाची अशीही गत..‘चिल्लर’साठी वणवण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 14:55 IST2016-11-09T13:57:48+5:302016-11-09T14:55:13+5:30
मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक धमाका केला. ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या त्यांच्या घोषणेने सर्वत्र ...

बिपाशाची अशीही गत..‘चिल्लर’साठी वणवण!
म गळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक धमाका केला. ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या त्यांच्या घोषणेने सर्वत्र एकच खळबळ माजली. मग काय, सगळीकडे शंभरीसाठी शोधाशोध सुरु झाली. शंभरीची मागणी अशी काही वाढली की, सगळीकडे या नोटांचा जणू ‘दुष्काळ’ पडला. सुट्या पैशांच्या शोधात लोकांंची चांगलीच धांदल उडाली. केवळ लोकांचीच नाही तर आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचीही. होय, आम्ही बोलतोय, ते बिपाशा बसूबद्दल. ५०० अन् १००० च्या नोटा बंद झाल्याने बिपाशाला सकाळी सकाळी चांगलीच डोकुदुखी सहन करावी लागली. इतकी की, शंभराच्या नोटा नसल्याने वा सुटे पैसे नसल्याने त्यासाठी तिला वणवण हिंडावे लागले. एकंदर काय तर बिपाशावर इतकी वाईट स्थिती ओढवली की तिला अंडी खरेदी करण्यासाठी आपल्या मित्रांकडून सुटे पैसे उधार घ्यावे लागले. खुद्द बिपाशानेच twitterवर ही माहिती दिली. ‘आत्ताच रॉकीकडून पैसे उधार घेतले. कारण अंडी घ्यायची होती. काय दिवस आहे,’ असे tweet तिने केले.
Just borrowed money from @RockyStarWorld to buy eggs