Birthday Special : दहा वर्षाच्या अफेअरमध्ये मिळाला धोका, मग ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी बनली बिपाशा बासू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 10:55 IST2018-01-07T05:25:10+5:302018-01-07T10:55:10+5:30

बॉलिवूडची ‘डस्की ब्युटी’ बिपाशा बासू हिचा आज (७ जानेवारी) वाढदिवस. मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि ...

Bipasha Basu becomes the third wife of the actress. | Birthday Special : दहा वर्षाच्या अफेअरमध्ये मिळाला धोका, मग ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी बनली बिपाशा बासू!

Birthday Special : दहा वर्षाच्या अफेअरमध्ये मिळाला धोका, मग ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी बनली बिपाशा बासू!

लिवूडची ‘डस्की ब्युटी’ बिपाशा बासू हिचा आज (७ जानेवारी) वाढदिवस. मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली.  ‘जिस्म’, ‘राज’, ‘अजनबी’ आणि ‘धूम’यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने  अनेक हिट सिनेमे दिलेत. 
 ७ जानेवारी १९७९ रोजी दिल्लीत तिचा जन्म झाला. बिपाशाचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील नेहरु प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय कोलकातामध्ये शिफ्ट झाले. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला ‘राज’ हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळाले होते. त्यानंतर २००५ मध्ये आलेला ‘नो एन्ट्री’ हा सिनेमासुद्धा हिट ठरला होता. बिपाशाने आत्तापर्यंत जवळजवळ ५५ सिनेमांमध्ये अभिनय केला.



साधारण रूप घेऊन जन्मास आलेल्या बिपाशाने वयाच्या १६ वर्षीय मॉडेलिंग सुरु केली होती. याच वयात तिने गोदरेज सिंथॉल सुपर मॉडेल कॉन्टेस्ट जिंकला. यानंतर बिप्सने अनेक मॉडेलिंग असाईनमेंट्स केल्यात आणि मग ती बॉलिवूडमध्ये आली.



फिटनेस आणि अतिशय सेक्सी फिगरमुळे बिपाशा कायम बॉलिवूडचे डायरेक्टर्स आणि प्रोड्यूसरची आवडती राहिली. २०११ मध्ये टाइम्सली केलेल्या सर्वेक्षणात ५० मोस्ट डियायरेबल वूमनच्या यादीत बिपाशा आठव्या स्थानावर होती. २०१३ मध्ये या यादीत तिने सातवे स्थान मिळवले. यानंतर २००५ आणि २००७ मध्ये युकेच्या ईस्टर्न आय मॅगझिनने बिपाशाला मोस्ट सेक्सिएस्ट वूमन इन एशियाचा किताब देऊन गौरविले.



बोल्ड आणि सेक्सी इमेजसाठी ओळखली जाणारी बिपाशा करिअरसोबत तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहिली. ‘राज’ या चित्रपटादरम्यान बिपाशा आणि अभिनेता डिनो मोरिया एकमेकांच्या जवळ आलेत आणि त्यांचे प्रेम रंगले. यानंतर सहा वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण सहा वर्षानंतर दोघांचेही मार्ग वेगवेगळे झालेत. २००२ मध्ये ‘गुनाह’ या चित्रपटात बिपाशा व डिनो अखेरचे एकत्र दिसले. अतिशय बोल्ड शिवाय डिनो व बिपाशाची तेवढीच हॉट केमिस्ट्री असे सगळे असूनही हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. ब्रेकअपनंतरही बिपाशा व डिनो आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.



डिनोनंतर बिपाशाच्या आयुष्यात जॉन अब्राहमची एन्ट्री झाली. या दोघांचे अफेअर तब्बल दहा वर्षे चालले. ‘जिस्म’च्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती आणि पुढे प्रेम झाले. दहा वर्षातील या दोघांचे बॉन्डिंग बघता, हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत जाईल, असे मानले जात होते. पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते.   या लव्हस्टोरीला १० वर्षांनंतर ब्रेक लागला.



जॉनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशाचे नाव हर्मन बावेजासोबतही जुळले. अर्थात या दोघांचे अफेअर फार काळ चालले नाही. 



ALSO READ : खरंच बिपाशा बसू गर्भवती आहे काय? व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण!

हर्मन बावेजानंतर बिपाशाच्या आयुष्यात करणसिंग ग्रोव्हरची एन्ट्री झाली. ‘अलोन’च्या सेटवर बिपाशा व करण एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर करण विवाहित होता. त्याची दोन लग्ने झाली होती. पण यामुळे बोल्ड बिपाशाला काहीच फरक पडला नाही. बिपाशाने करणची तिसरी पत्नी होणे आनंदाने स्वीकारले.

Web Title: Bipasha Basu becomes the third wife of the actress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.