​बिकनीत दिसली मान्यता दत्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 13:22 IST2016-11-07T13:22:19+5:302016-11-07T13:22:19+5:30

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त ख-या अर्थाने आयुष्य जगतो आहे. मित्र आणि कुटुंबासोबत तो अगदी खुलेपणाने एन्जॉय करतो आहे. तिकडे संजयची पत्नी मान्यता ही सुद्धा आयुष्याचा आस्वाद घेते आहे. सध्या ती जुळी मुले इकरा व शहरानसोबत श्रीलंकेत सुटीचा आनंद घेते आहे.

The bikinieti visli dutt ... | ​बिकनीत दिसली मान्यता दत्त...

​बिकनीत दिसली मान्यता दत्त...

रुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त ख-या अर्थाने आयुष्य जगतो आहे. मित्र आणि कुटुंबासोबत तो अगदी खुलेपणाने एन्जॉय करतो आहे. तिकडे संजयची पत्नी मान्यता ही सुद्धा आयुष्याचा आस्वाद घेते आहे. सध्या ती जुळी मुले इकरा व शहरानसोबत श्रीलंकेत सुटीचा आनंद घेते आहे. श्रीलंकेतील या ट्रिपचे काही फोटो मान्यताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात मान्यता बिकनीमध्ये समुद्रकिनारी मुलांसोबत मस्ती करताना दिसते आहे.  यात मान्यता अतिशय हॉट दिसते आहे. मान्यता श्रीलंकेत तर संजय तंजानियात आहे. तो तिथे वाईल्ड लाईफ एन्जॉय करतो आहे.



सन २००८मध्ये मान्यता व संजय यांचा विवाह झाला होता. मान्यतापूर्वी संजयच्या आयुष्यात अनेक मुली येऊन गेल्या. मात्र मान्यता आयुष्यात आल्यानंतर संजयचे आयुष्यच बदलून गेले. मान्यता प्रत्येकवेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मान्यताचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. तिचे लहानपण दुबई गेले. पण अभिनयासाठी तिने मुंबई गाठली. बॉलिवूडमध्ये मान्यता सारा खान या नावाने ओळखली जात असे. २००३ मध्ये ती प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’मध्ये एक आयटम साँग करताना दिसली. या चित्रपटाने तिला मान्यता हे नाव दिले. मान्यता बॉलिवूडमध्ये पाय रोवू पाहत असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी मान्यताच्या खांद्यावर आली. २००६ मध्ये मान्यता व संजय दत्त भेटले. यानंतर काहीच दिवसांत संजय व मान्यता एकत्र दिसू लागले आणि नंतर लग्नबंधनात अडकले. या लग्नाला संजयची ना मुलगी (पहिल्या पत्नीची मुलगी)आली, ना त्याच्या दोन्ही बहिणी. या लग्नानंतर अचानक एका व्यक्तिने मान्यता माझी पत्नी असल्याचा दावा करून खळबळ माजवून दिली. त्याने त्याचे व मान्यताचे काही फोटोही जाहिर केले. पण याचा संजय व मान्यताच्या वैवाहिक आयुष्यावर काहीही परिणाम झाला नाही.





Web Title: The bikinieti visli dutt ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.