bigg boss11 : ​‘बिग बॉस11’मधून ‘बेघर’ झालेल्या सपना चौधरीला मिळाली बॉलिवूडची मोठी आॅफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:25 IST2017-11-27T09:55:10+5:302017-11-27T15:25:52+5:30

‘बिग बॉस11’ची ‘हरियाणवी सेन्सेशन’ सपना चौधरी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलीय. पण घरातून बेघर झालेल्या सपनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची ...

bigg boss11: 'Bigg Boss11' gets 'homeless' dream girl gets bigger! | bigg boss11 : ​‘बिग बॉस11’मधून ‘बेघर’ झालेल्या सपना चौधरीला मिळाली बॉलिवूडची मोठी आॅफर!

bigg boss11 : ​‘बिग बॉस11’मधून ‘बेघर’ झालेल्या सपना चौधरीला मिळाली बॉलिवूडची मोठी आॅफर!

िग बॉस11’ची ‘हरियाणवी सेन्सेशन’ सपना चौधरी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलीय. पण घरातून बेघर झालेल्या सपनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, डान्स म्हटला की, सपनाचेच नाव समोर येते. याच कारणाने बॉलिवूडच्या एका मोठ्या कोरिओग्राफर व दिग्दर्शकाने सपनाला आॅफर दिली आहे. आता हा कोरिओग्राफर व डायरेक्टर कोण, हे तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते रेमो डिसूजाबद्दल.





या वीकेंडला रेमो व जॅकलिन फर्नांडिस हे दोघे ‘रेस3’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस11’च्या घरात पोहोचले होते. यादरम्यान घरातील स्पर्धकांना काही टास्कही करायचे होते. डान्सची वेळ आल्यावर सगळ्यांनीच सपनाचे नाव घेतले. सपनाने रेमोच्याच ‘अ फ्लार्इंग जट्ट’च्या ‘बिट पे बुटी’ या लोकप्रीय गाण्यावर डान्स केला. सपनाचा डान्स पाहून रेमो इतका प्रभावित झाला की, त्याने लगेच तिला आॅफर देऊन टाकली. तू इतकी चांगली डान्सर आहेस तर तुझ्यासोबत काम करणे तर बनतेच, असे रेमो सपनाला म्हणाला. सपनासाठी हा गोड धक्का होता.



‘आपके साथ? सपने में भी नहीं,’ असे सपना म्हणाली. सपनाला हा विनोद वाटला. पण रेमोने मात्र प्रत्यक्षात सपनाला आॅफर दिली होती. हे स्वप्न नाही, वास्तव आहे, असे रेमो सपनाला म्हणाला. यावेळी सपनाच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता. सपना ‘लव्ह बाईट’ या गाण्याद्वारे अलीकडेच बॉलिवूड डेब्यू केला आहे. गत महिन्यातचं तिचे हे गाणे रिलीज झाले. आता लवकरच सपनाला एक मोठी संधी मिळणार आहे. होय, रेमोसोबत काम करण्याची संधी सपनाला मिळणार आहे.

ALSO READ : ​‘बिग बॉस11’ची स्पर्धक सपना चौधरीला मिळाला बॉलिवूड ब्रेक; पाहा टीजर!!

‘बिग बॉस11’मध्ये सपनाकडे एक सक्षम दावेदार म्हणून पाहिले गेले होते. या सीझनमध्ये घरातून बाहेर होण्यासाठी ती सात वेळा नॉमिनेट झाली. पण प्रत्येकवेळी लोकांच्या प्रेमाखातर बचावली. अर्थात या आठवड्यात तिला घराबाहेर पडावेच लागले आणि याचसोबत सपनासाठी ‘बिग बॉस11’चा प्रवास इथेच संपला. अर्थात इथूनच बॉलिवूडमधील तिचा प्रवास सुरु झालायं, असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: bigg boss11: 'Bigg Boss11' gets 'homeless' dream girl gets bigger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.