‘अल्कोहोलिक’ म्हणताच भडकली पूजा भट्ट! ट्रोलरचा घेतला क्लास!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 14:19 IST2018-04-23T08:49:10+5:302018-04-23T14:19:10+5:30
अभिनेत्री पूजा भट्ट आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नाही. पण पडद्यामागे ती प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियावरही ती तितकीच सक्रिय ...

‘अल्कोहोलिक’ म्हणताच भडकली पूजा भट्ट! ट्रोलरचा घेतला क्लास!!
अ िनेत्री पूजा भट्ट आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नाही. पण पडद्यामागे ती प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियावरही ती तितकीच सक्रिय आहे. आतासोशल मीडियावर सक्रिय म्हटले की, ट्रोलिंग हे आलेच. सेलिब्रिटींसाठी तर ते अजिबात नवे नाही. पण पूजाला अशा ट्रोलिंगने फरक पडत नाही. पूजा अशा ट्रोलर्सकडे अजिबात लक्ष देत नाही. मात्रगरज पडलीच तर ट्रोलर्सला क्लास घ्यायलाही मागेपुढे बघत नाही. अलीकडे असेच झाले. एका ट्रोलरने पूजाला ‘अल्कोहोलिक’ म्हणून डिवचले अन् पूजाचा पारा चांगलाच चढला. तिने या ट्रोलरला चांगलीच खरी खोटी सुनावली.
कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची पूजाने निंदा केली होती. बिग बींच्या एका चाहत्याला हे खटकले आणि त्याने पूजाला ‘दारूडी’ म्हटले. ‘ एक हंगामी किडा आणि एक कुप्रसिद्ध अल्कोहोलिक अमिताभ बच्चन यांच्या नावावर पब्लिसिटी मिळवण्याचे प्रयत्न करतेय,’ असे या युजरने लिहिले.
![]()
युजरचे हे tweet पूजाला चांगलेच झोंबले. विशेषत: त्यातील ‘अल्कोहोलिक’ हा शब्द तिला जरा जास्तचं झोंबला. मग काय, तिने त्या युजरला चांगलेच फैलावर घेतले.‘दारूच्या व्यसनापासून मी मुक्त झाले, याचा मला गर्व आहे. असा देश जिथे लोकांना हेही ठाऊक नाही की, त्यांना पिण्याचे व्यसन आहे, तिथे मी गर्दीपेक्षा वेगळी आहे, याचा मला आनंद आहे,’ असे पूजाने लिहिले.
ALSO READ : पूजा भट्ट की मोहित सूरी? कोण दिग्दर्शित करणार ‘सडक2’?
तुम्हाला ठाऊक नसेल पण एकेकाळी पूजाला दारूचे प्रचंड व्यसन होते. पण २०१६ पासून पूजाने दारू पिणे कायमचे सोडले. पूजाने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, मी केवळ २३ वर्षांची असताना सगळ्यात पहिल्यांदा सिगारेट ओढली. मी १६ व्या वषार्पासून दारू पित आहे. माझ्या कुटुंबात अतिशय मोकळे वातावरण असल्यानेमी घरातच अनेक वेळा दारू पित असे. रविवारी तर आवर्जून वाईन आणि बियर घरी प्यायली जायची. या सगळ्यामुळे मी दारुच्या अधीन कधी गेले हे मला देखील कळले नाही. पण माझ्या वडिलांच्या केवळ एका मेसेजमुळे मी दारू सोडली. मी आणि माझे वडील २१ डिसेंबर २०१६ ला मेसेजद्वारे एकमेकांशी बोलत होतो. आम्ही देशाची सध्या स्थिती काय आहे यावर बोलत होतो. ते बोलून झाल्यावर त्यांनी मला ‘आय लव्ह यू बेटा’असा मेसेज पाठवला. त्यावर मी देखील ‘आय लव्ह यू टू’चा मेसेज पाठवला. त्यावर त्यांनी मला मेसेज पाठवला की, तू माझ्यावर प्रेम करत असशील तर स्वत:वर प्रेम करायला शिक... कारण मी तुझ्यातीलच एक आहे. त्या मेसेजनंतर मला माझी चूक लक्षात आली आणि मी दारू पूर्णपणे सोडली. आज माझ्यासमोर कोणी दारू पित असेल तरी मला दारू पिण्याची इच्छा होत नाही.