मंदिरा बेदीचा खुलासा, ‘माझ्या हेअरस्टाइलचा फायदा अन् तोटाही’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 18:22 IST2018-04-08T12:45:34+5:302018-04-08T18:22:19+5:30

मंदिरा बेदी हिने बॉलिवूडमध्ये मोजक्याच भूमिका साकारल्या. परंतु तिला अशाप्रकारच्या भूमिका का साकाराव्या लागल्या, याबाबतचा तिने नुकताच खुलासा केला आहे.

Bedi reveals, 'My hairstyle benefits and losses'! | मंदिरा बेदीचा खुलासा, ‘माझ्या हेअरस्टाइलचा फायदा अन् तोटाही’!

मंदिरा बेदीचा खुलासा, ‘माझ्या हेअरस्टाइलचा फायदा अन् तोटाही’!

्टीटॅलेंटेड अभिनेत्री मंदिरा बेदीच्या मते, डोक्यावरील लहान केसांमुळे मला इंडस्ट्रीत मोजक्याच भूमिकांपर्यंत मर्यादित राहावे लागले. मंदिरा लवकरच आगामी ‘साहो’ या चित्रपटात निगेटीव्ह भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटात सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रचंड आतुरता आहे. बºयाच काळानंतरही मंदिरादेखील या बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

मंदिराने दिलेल्या माहितीनुसार, मी अबूधाबी येथील शूटिंगसाठी रवाना होत आहे. मला असे वाटते की, प्रेक्षक मला पोलीस अधिकारी किंवा एखाद्या नकारात्मक भूमिकांमध्येच बघणे पसंत करतात. अन्य भूमिकांमध्ये मला बघण्याविषयी प्रेक्षक विचारही करीत नाहीत. खरं तर मी माझ्या छोट्या केसांच्या हेअरस्टाइलमुळेच अशाप्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून गेली आहे. दरम्यान, मंदिराने नुकतेच ‘अदंगॅथी’ या तामीळ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. या चित्रपटात ती एका पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. 
 

यावेळी मंदिराला, विविध भूमिका साकारण्यासाठी तू हेअरस्टाइल बदलू इच्छितेस काय? असे विचारले असता तिने म्हटले की, ‘नाही... कधीच नाही. मी केस वाढविण्याचा कधीच विचार केला नाही. खरं तर हा विचार बदलण्याची गरज आहे की, छोटी हेअरस्टाइल असलेली महिला एक प्रेमिका, आई किंवा पत्नीची भूमिका का साकारू शकत नाही? मंदिराने इंडस्ट्रीत जेव्हा एंट्री केली होती, तेव्हा तिची हेअरस्टाइल आता जशी आहे तशीच होती. अजूनही तिने तिच्या हेअरस्टाइलमध्ये बदल केला नाही. 

Web Title: Bedi reveals, 'My hairstyle benefits and losses'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.