'थोडी तरी लाज बाळग..'; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मलायका अरोरा झाली चांगलीच ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:04 PM2022-02-07T16:04:42+5:302022-02-07T16:05:04+5:30

Malaika Arora: मलायका अरोराची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच संतापले आणि तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

'Be a little ashamed ..'; After the death of Lata Mangeshkar, Malaika Arora became a good troll | 'थोडी तरी लाज बाळग..'; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मलायका अरोरा झाली चांगलीच ट्रोल

'थोडी तरी लाज बाळग..'; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मलायका अरोरा झाली चांगलीच ट्रोल

googlenewsNext

मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडची ती अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. कधी तिच्या फोटोंना पसंती मिळते तर कधी तिला त्यावरून ट्रोल केले जाते. काल म्हणजेच ६ फेब्रुवारी रोजी मलायका अरोराने एक बोल्ड फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच संतापले आणि तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने पुन्हा एकदा बोल्ड लूक चाहत्यांसोबत शेअर केला. या फोटोत ती केशरी रंगाच्या ब्रालेटमध्ये पाहायला मिळाली. हा फोटो शेअर करून तिने लिहिले - 'संडे सनी साइड अप'.


या फोटोमध्ये ४८ वर्षीय मलायका पूलजवळ आराम करताना दिसत आहे. तिने केशरी रंगाचा ब्रालेट आणि काळी शॉर्ट्स घातलेली होती.पूलजवळ, ती सूर्यापासून व्हिटॅमिन डी घेत असताना तिचे टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसते आहे.

मलायकावर संतापले नेटकरी
जसा मलायका अरोराने तिचा हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. तसे तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव व्हायला सुरूवात झाली. तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने चांगले कॅप्शन अशी कमेंट केली. काही लोकांनी तिच्या फोटोची प्रशंसा केली. तर काही लोक नाराज झाले. त्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली. एका युजरने लिहिले की, थोडी तरी लाज बाळग. तर दुसऱ्याने लिहिले की, आज तरी कमीत कमी हा फोटो पोस्ट करायला नको होता. तर आणखी एका युजरने लिहिले की, RIP लता दीदी, आजचा दिवस थांबला असतात मॅडम.

खरेतर, लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीनंतर मलायकाने अशी पोस्ट करायला नको होती, असे काही लोकांचे मत आहे, त्यामुळे लोक आता तिला ट्रोल करत आहेत.

Web Title: 'Be a little ashamed ..'; After the death of Lata Mangeshkar, Malaika Arora became a good troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.