B'day Special : बारावी नापास असलेली कंगना राणौत आहे बॉलिवूडमधील सर्वांत महागडी अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 16:10 IST2018-03-23T10:40:14+5:302018-03-23T16:10:14+5:30

रिव्हॉल्वर राणी कंगना राणौत आज तिचा ३१वा वाढदिवस साजरा करीत आहे. इयत्ता बारावीत अनुत्तीर्ण असलेली कंगनाची आज बॉलिवूडमधील सर्वांत ...

B'day Special: Kangna, who has not signed the XIIth, is the most expensive actress in Bollywood. | B'day Special : बारावी नापास असलेली कंगना राणौत आहे बॉलिवूडमधील सर्वांत महागडी अभिनेत्री!

B'day Special : बारावी नापास असलेली कंगना राणौत आहे बॉलिवूडमधील सर्वांत महागडी अभिनेत्री!

व्हॉल्वर राणी कंगना राणौत आज तिचा ३१वा वाढदिवस साजरा करीत आहे. इयत्ता बारावीत अनुत्तीर्ण असलेली कंगनाची आज बॉलिवूडमधील सर्वांत यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. परंतु तिला हे यश मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. वाद करून घराबाहेर पडलेल्या कंगनाला कधीकाळी रस्त्यावर रात्र काढावी लागली. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टींचा खुलासा करणारा हा खास वृत्तांत...

कंगनाने बॉलिवूडमध्ये आपल्या हटके अ‍ॅटिट्यूडने एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. इंडस्ट्रीतील ती एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिला बॉलिवूडमधील खानसोबत काम करण्याची अजिबातच इच्छा नाही. कंगनाच्या मते, ती तिच्या हिम्मतीवर हिट चित्रपट देऊ शकते. त्यासाठी तिला एकाही खानची गरज नाही. गेल्यावर्षी कंगनाने आपला वाढदिवस मुंबईत साजरा केला होता. त्या अगोदर तिने आपल्या परिवारासमेवत भांबला या आपल्या गावी वाढदिवस साजरा केला होता. बॉलिवूडमध्ये कंगना राणौत अशी अभिनेत्री म्हणून पुढे आली आहे, जी अभिनेत्याशिवायच शंभर कोटी रूपयांचा चित्रपट देऊ शकते. 



कंगनाचा जन्म २३ मार्च १९८७ मध्ये हिमाचलमधील मंडी जिल्ह्यातील सूरजपूर येथील एका राजपूत परिवारात झाला. परिवारात तिच्या व्यतिरिक्त मोठी बहीण रंगोली आणि लहान भाऊ अक्षत आहे. कंगनाची आई आशा रणौत एक स्कूल टीचर आहेत, तर वडील बिझनेसमॅन आहेत. कंगनाचे वडील तिला डॉक्टर बनवू इच्छित होते. मात्र ती बारावीतच नापास झाल्याने त्यांचे हे स्वप्न भंगले. त्यानंतर कंगनाने आई-वडिलांशी भांडण करून थेट दिल्ली गाठली. याठिकाणी आल्यानंतर तिने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. परंतु याठिकाणी तिच्या राहण्याखाण्याची कुठलीच व्यवस्था नव्हती. शिवाय तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. 

पुढे कशीबशी कंगना मुंबईत आली. याठिकाणी तिने चार महिन्यांच्या अभिनयाचा कोर्स केला. तेथून कंगनाचा क्वीन बनण्याचा प्रवास सुरू झाला. कंगनाला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी २००६ मध्ये बेस्ट फिमेल डेब्यूचा ग्लोबल इंडियन फिल्म अवॉडर््स मिळाला. ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘क्वीन’ या चित्रपटांनी कंगनाला अशी काही लोकप्रियता मिळवून दिली की, ती आज इंडस्ट्रीमधील सर्वांत महागडी अभिनेत्री बनली आहे. कंगनाला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तीन वेळा राष्टÑीय पुरस्कारही मिळाला आहे. तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार ‘फॅशन’साठी मिळाला होता. तेव्हा ती केवळ २२ वर्षांची होती. 

Web Title: B'day Special: Kangna, who has not signed the XIIth, is the most expensive actress in Bollywood.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.