B'day Special : ‘गॅँगस्टर’ची गर्लफ्रेंड बनली नसती, तर आज पोर्न स्टार असती; कंगना राणौतचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 16:50 IST2018-03-23T11:20:14+5:302018-03-23T16:50:59+5:30

कंगना राणौत आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील सर्वांत यशस्वी अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्याशिवाय स्वत:च्या हिमतीवर चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट करण्याची ...

B'day Special: 'Gangster' would not have been a girlfriend, today would be a porn star; Kangana reveals Raanot! | B'day Special : ‘गॅँगस्टर’ची गर्लफ्रेंड बनली नसती, तर आज पोर्न स्टार असती; कंगना राणौतचा खुलासा!

B'day Special : ‘गॅँगस्टर’ची गर्लफ्रेंड बनली नसती, तर आज पोर्न स्टार असती; कंगना राणौतचा खुलासा!

गना राणौत आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील सर्वांत यशस्वी अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्याशिवाय स्वत:च्या हिमतीवर चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट करण्याची ताकद ठेवणारी कंगना आज तिच्या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन स्वीकारते. मात्र एक काळ असाही होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये चित्रपट मिळत नव्हते, तेव्हा कंगना कामाच्या शोधासाठी चक्क पोर्न इंडस्ट्रीमध्ये पोहोचली होती. होय, कंगनानेच याबाबतचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला होता. १७व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाºया कंगनाचा आतापर्यंतचा प्रवास खूपच चॅलेंजिंग असा राहिला आहे. 

Vh1 Inside Access या टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सांगितले होते की, हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा भाग बनण्याअगोदर मी एक अ‍ॅडल्ट फिल्म साइन केली होती. मला या चित्रपटासाठी फोटोशूट करायचे होते. परंतु जेव्हा मी याठिकाणी पोहोचली तेव्हा मला सर्वकाही ठीक वाटले नाही. तेव्हा मी टीनऐज होती, अशात मला हा रोल आॅफर करण्यात आला होता. मला माहिती होते की, हे चुकीचे आहे. परंतु काम मिळत नसल्याने मी निर्धार केला होता की, आता हे करायचंच आहे. परंतु जेव्हा मी फोटोशूटसाठी आली तेव्हा मला ते एखाद्या अश्लील चित्रपटाप्रमाणे वाटले. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, हे करणे चुकीचे आहे. कारण तसे करणे खरोखरच योग्य नव्हते. 



पुढे कंगनाने सांगितले की, अनुराग बसूने जर मला ‘गॅँगस्टर’ या चित्रपटात भूमिका दिली नसती तर आज मी कदाचित पोर्न इंडस्ट्रीत असती. या चित्रपटात तिने ‘गॅँगस्टर’च्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. असो, पण गॅँगस्टरसाठीही मला बरेचसे आॅडिशन्स द्यावे लागले. यासाठी मला कित्येक महिने प्रतीक्षा करावी लागली. परंतु चित्रपट मिळाल्यानंतर जणू काही करिअरची दिशाच बदलली. त्यानंतर मी या इंडस्ट्रीपासून दूर राहणे पसंत केले. या चित्रपटानंतर मी माझ्या अभिनयावर खूप मेहनत घेतली. पुढे एकापेक्षा एक चॅलेंजिंग अशा भूमिका साकारल्या.’ आज कंगना बॉलिवूडमधील सर्र्वांत यशस्वी अभिनेत्री आहे. शिवाय चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन आकारणाºया अभिनेत्रींमध्येही कंगनाचे नाव घेतले जाते. 

कंगनाने २०१६ मध्ये तिच्या ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटासाठी तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळविला. या अगोदर ‘क्वीन’साठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आणि ‘फॅशन’साठी तिला सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘गॅँगस्टर’पासून ते ‘सिमरन’पर्यंतचा तिचा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. यादरम्यान तिला अनेक संकटांचाही सामना करावा लागला. परंतु तिने धाडसाने यातून मार्ग काढत इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले. 

Web Title: B'day Special: 'Gangster' would not have been a girlfriend, today would be a porn star; Kangana reveals Raanot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.