​‘बाहुबली2’ आधी रिलीज होणार ‘बाहुबली: दी बिगिनिंग’!! पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 11:00 IST2017-03-17T05:30:56+5:302017-03-17T11:00:56+5:30

देशभरातील सिनेप्रेमी ‘बाहुबली2’ची आतुरतेने प्रतीक्षा करत असताना आता एक वेगळीच बातमी आहे. होय,  ‘बाहुबली2’ रिलीज होण्याआधी ‘बाहुबली: दी बिगिनिंग’ ...

'Bahubali 2' will be released before 'Bahubali: The Beginning' !! But why? | ​‘बाहुबली2’ आधी रिलीज होणार ‘बाहुबली: दी बिगिनिंग’!! पण का?

​‘बाहुबली2’ आधी रिलीज होणार ‘बाहुबली: दी बिगिनिंग’!! पण का?

शभरातील सिनेप्रेमी ‘बाहुबली2’ची आतुरतेने प्रतीक्षा करत असताना आता एक वेगळीच बातमी आहे. होय,  ‘बाहुबली2’ रिलीज होण्याआधी ‘बाहुबली: दी बिगिनिंग’ अर्थात ‘बाहुबली2’चा पहिला भाग रिलीज होणार आहे. म्हणजेच,‘बाहुबली: दी बिगिनिंग’ पुन्हा एकदा रिलीज केला जाणार आहे. आता यामागे काय कारण आहे? हे तुम्हाला जाणून घ्यायचेयं तर ऐका...
‘बाहुबली’च्या निर्मात्यांचे मते, अद्यापही अनेक प्रेक्षकांनी ‘बाहुबली’ हा पहिला पार्ट बघितलेला नाही. त्यांना तो बघता यावा, म्हणूनच हा भाग पुन्हा एकदा रिलीज केला जाणार आहे.
दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी सांगितले की, आम्ही ‘बाहुबली2’ रिलीज होण्याआधी ‘बाहुबली: द बिगिनिंग’ हा पहिला भाग रिलीज करणार आहोत. यामुळे ज्यांना पहिला भाग बघता नाही आला; त्यांना तो बघता येईल. कारण तो पाहिल्याशिवाय पार्ट2 चा नेमका आनंद घेता येणार नाही. 
‘बाहुबली’चे अजून पुढचे भाग ही येतील का या प्रश्नावर बोलतांना राजामौली म्हणाले, सिक्वेल करण्यासाठी सिनेमाची कथा ही मजबूत असली पाहिजे. लोकांची मागणी आहे म्हणून आम्ही सिनेमा नाही बनवू इच्छितो. सिनेमाची कथा त्याच्या आत्म्या प्रमाणे असते. 

ALSO READ : Bahubali 2 : फक्त १० तासांतच ट्रेलरने तोडले अनेक रेकॉर्ड; पिक्चर अभी बाकी है!
bahubali-2 trailer : केवळ अदभूत! डोळे दिपवून टाकणारा प्रोमो!!

‘बाहुबली २: द कन्क्लूजन’ २८ एप्रिलला रिलीज होणार आहे.  ‘बाहुबली: द बिगिनिंग’चा सीक्वल आहे. काल गुरुवारी  ‘बाहुबली २’चा अद्भूत असा ट्रेलर लॉन्च झाला. गेल्या २४ तासांत कोट्यवधी लोकांनी हा ट्रेलर बघितला आहे. यावरून लोक हा चित्रपट बघण्यास किती आतूर आहे,याची कल्पना येते.  या चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन आणि सत्यराज यासारखे कलाकार दिसणार आहेत.

Web Title: 'Bahubali 2' will be released before 'Bahubali: The Beginning' !! But why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.