​ ‘बेफिक्रे’ वाणी कपूरचे ‘बेफिक्रे’ फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 14:40 IST2017-07-11T09:09:27+5:302017-07-11T14:40:13+5:30

‘बेफिक्रे’नंतर वाणी कपूर काय करतेय? याचे उत्तर सध्या तरी फोटोशूट असेच आम्ही देऊ. होय, वाणीने एका मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट ...

'Bachkere' Vani Kapoor's 'Bichrere' Photoshoot !! | ​ ‘बेफिक्रे’ वाणी कपूरचे ‘बेफिक्रे’ फोटोशूट!!

​ ‘बेफिक्रे’ वाणी कपूरचे ‘बेफिक्रे’ फोटोशूट!!

ेफिक्रे’नंतर वाणी कपूर काय करतेय? याचे उत्तर सध्या तरी फोटोशूट असेच आम्ही देऊ. होय, वाणीने एका मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती कमालीची हॉट दिसतेय. या फोटोंमध्ये वाणी  फ्लोरल आणि ब्राईट प्रिन्ट्समध्ये दिसतेय. 



ब्राईट ग्रीन प्रिन्टेड पॅन्ट आणि व्हाईट टॉप आणि त्यावर साजेसे जॅकेट शिवाय डोळ्यांवर ट्रेन्डी सनग्लासेस व हातात बांगड्या अशा लूकमधील हा फोटो पाहून तुम्हीही वाणीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.




गोड नारळपाण्याचा मोह कुणाला होणार नाही? वाणीलाही तो झाला असावा.  तिचा हा फोटो असेच काही सांगणारे आहे. या फोटोतील वाणीचा आय मेकअप लक्ष वेधून घेणारा आहे.



या फोटोत वाणी मॅक जॅकोबने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये दिसतेय. ब्रॉऊन सँडल, डोळ्यांवर गॉगलने तिचे रूप आणखीच खुलून आले आहे.



या फोटोत वाणी हिरव्या रंगाच्या बॉडीसूटमध्ये दिसतेय. एकंदर काय तर वाणीच्या या हॉट फोटोशूटने सध्या चांगलीच आग लावलीय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. आपल्या  ‘बेफिक्रे’अंदाजाने सगळ्यांच्या पसंतीत उतरलेली वाणी अलीकडे वेगळ्याच कारणाने चर्चेत आली होती. वाणीने चिन व लिप सर्जरी केल्याच्या बातम्या मध्यंतरी पसरल्या होत्या. यावरून सोशल मीडियावर वाणी बरीच ट्रोल झाली होती. सुंदर वाणी सर्जरीनंतर हँडसम वाना बनला, अशा कमेंट्स तिला सहन कराव्या लागल्या होत्या. अर्थात वाणी या सगळ्या कमेंट्सला पुरून उरली होती. माझ्याकडे इतकी महागाची सर्जरी करण्यासाठी पैसा नाही, असे तिने म्हटले होते.

Web Title: 'Bachkere' Vani Kapoor's 'Bichrere' Photoshoot !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.