बॉर्डर या चित्रपटातील धर्मवीर या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हे तर या अभिनेत्याची करण्यात आली होती निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 08:31 IST2017-08-15T03:01:09+5:302017-08-15T08:31:09+5:30

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हटला की, बॉर्डर हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळतोच. आज स्वातंत्र्य दिनाच्या ...

Bachchan was chosen by Akshay Khanna for the role of Dharmaveer in this film, but this actor was nominated for this role | बॉर्डर या चित्रपटातील धर्मवीर या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हे तर या अभिनेत्याची करण्यात आली होती निवड

बॉर्डर या चित्रपटातील धर्मवीर या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हे तर या अभिनेत्याची करण्यात आली होती निवड

वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हटला की, बॉर्डर हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळतोच. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाविषयी जाणून घेऊया एक गुपित...
बॉर्डर या चित्रपटात सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. या चित्रपटात लेफ्टनंट धर्मवीरची भूमिका अक्षय खन्नाने साकारली होती. पण तुम्हाला माहीत आहे का की, या भूमिकेसाठी जे पी दत्ता यांची पहिली चॉईस अक्षय नव्हता. या चित्रपटातील धर्मवीरची भूमिका सलमान खानने साकारावी असे जे पी दत्ता यांना वाटत होते आणि त्यामुळे त्यांनी या भूमिकेसाठी सलमान खानला विचारले देखील होते. पण सलमानने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

salman khan

सलमानच्या नकारानंतर या भूमिकेसाठी अक्षय कुमारसोबत देखील बोलणे झाले होते. पण अक्षय देखील ही भूमिका साकारण्यास तयार नव्हता.

akshay kumar

अक्षयनंतर जे पी दत्ता यांनी अजय देवगणशी या भूमिकेबाबत चर्चा केली होती. पण मल्टीस्टारर चित्रपटात काम कऱण्यात अजयला रस नव्हता. सलमान, अक्षय आणि अजय यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर जे पी दत्ता यांनी अक्षय खन्नाला या चित्रपटासाठी विचारले आणि अक्षय या चित्रपटात काम करण्यास तयार झाला. 

ajay devgan
बॉर्डर या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रचंड गाजल्या. त्यातही धर्मवीरची भूमिका प्रेक्षकांना अधिक आवडली होती. धर्मवीर या भूमिकेसाठी अक्षय खन्नाला फिल्मफेअरचा सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार देखील मिळाला होता. 

Web Title: Bachchan was chosen by Akshay Khanna for the role of Dharmaveer in this film, but this actor was nominated for this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.