​‘बाबुमोशाय बंदुकबाज’चा ट्रेलर आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 15:46 IST2017-07-11T10:16:45+5:302017-07-11T15:46:45+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘बाबुमोशाय’ अंदाज पाहायला तुम्ही- आम्ही सगळचे उत्सूक आहोत. तर चला, आपली प्रतीक्षा ट्रेलरपुरती तरी संपली आहे. होय, ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला.

'Babumoshay Bandukaj' trailer came! | ​‘बाबुमोशाय बंदुकबाज’चा ट्रेलर आला!

​‘बाबुमोशाय बंदुकबाज’चा ट्रेलर आला!

ाजुद्दीन सिद्दीकीचा ‘बाबुमोशाय’ अंदाज पाहायला तुम्ही- आम्ही सगळचे उत्सूक आहोत. तर चला, आपली प्रतीक्षा ट्रेलरपुरती तरी संपली आहे. होय, ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. कुशन नंदीच्या या चित्रपटात नवाजुद्दीन एका शूटरच्या रोलमध्ये दिसणार आहे. कालच नवाजने ‘जानें क्यों सब हमको बे बुलाते है...मतलब बेशर्म बाबू’, अशा काहीशा विनोदी अंदाजात या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.  या ट्रेलरमध्ये नवाज अगदी अंडरवियरमध्ये रस्त्यावर धावण्यापासून कुंटणखान्यातीन मुलींसोबत अश्लिल चाळे करण्यापर्यंत अजब कारनामे करताना दिसतोय. अर्थात त्याच्या तोंडचे संवाद आणि त्याचा अभिनय नेहमीप्रमाणे अफलातून आहे. त्यामुळे हा ट्रेलर तुम्ही बघायलाच हवा.शिवाय तो कसा वाटला, हेही आम्हाला कळवायला हवे. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता.



या चित्रपटातील शूटरच्या भूमिकेसाठी नवाजने स्पेशल ट्रेनिंगच घेतले नाही तर जेम्स बॉन्डचे अनेक चित्रपटही पाहिलेत. या चित्रपटाची कथा नवाजचे मित्र, शत्रू, त्याचे प्रेम आणि त्याचा सूड याभोवती फिरणारी आहे.  या चित्रपटात नवाजसोबत ताहिर भसीन, दिव्या दत्ता आणि बंगाली अभिनेत्री बिदीता बेग मुख्य भूमिकेत आहे. येत्या आॅगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नवाजुद्दीनचा ‘मुन्ना मायकेल’ हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. पण यात नवाज टायगरसोबत थिरकताना दिसणार आहे. ‘मुन्ना मायकेल’मध्ये नवाज गँगस्टरच्या भूमिकेत आहे. गत शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘मॉम’मध्येही नवाज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला.  
 

Web Title: 'Babumoshay Bandukaj' trailer came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.