ऑटोरिक्षा चालकानं अनुपम खेर यांची केली बोलती बंद, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:35 PM2021-12-19T12:35:13+5:302021-12-19T12:37:15+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते Anupam Kher यांचे हटके व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल होतात. तूर्तास अनुपम यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

The autorickshaw driver stopped talking to Anupam Kher, you will be surprised to see the video | ऑटोरिक्षा चालकानं अनुपम खेर यांची केली बोलती बंद, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

ऑटोरिक्षा चालकानं अनुपम खेर यांची केली बोलती बंद, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अनुपम खेर (Anupam Kher) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. सिनेमाच नाही तर रोजच्या दैनंदिन आयुष्यातील अनोखे किस्से ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे  हटके व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल होतात. तूर्तास अनुपम यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका प्रवासात  अनुपम यांना एक  ऑटोरिक्षा चालक भेटला आणि त्यानं त्यांना असं काही प्रभावित केलं की, अनुपम त्याच्या प्रेमात पडले. (Anupam Kher's 'Encounters in Mumbai')
 अनुपम यांनी या रिक्षाचालकाच्या नावाचा आवर्जुन उल्लेख केला आहे. भूपती देवदास असं त्याचं नाव आहे.

 व्हिडीओ मुंबईतील आहे. योगा क्लासला जाताना अनुपम ऑटोतून जातो. अनुपम खेर  भूपतीच्या ऑटोतून प्रवास करतात आणि प्रवासादरम्यान त्यांच्या गप्पा सुरू होतात.  गप्पांच्या ओघात विषय भगवत गीतेवर येतो.  भूपती  त्यांना गीतेतील काही अध्यायातील ओव्या म्हणून दाखवतो. ते ऐकून अनुपम खेर यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हाच व्हिडीओ अनुपम यांनी सोशल मीडियावर  शेयर केला आहे.  ‘तुम्ही मला भेटलात हे माझं भाग्य’ या शब्दांत खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आत्तापर्यंत 70 हजारांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केला आहेत.
तुम्हीपण हा व्हिडीओ पाहा आणि आपल्या कमेंट्स अवश्य कळवा.

Web Title: The autorickshaw driver stopped talking to Anupam Kher, you will be surprised to see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.