‘पानीपत’ सिनेमासाठी साकारला जातोय भव्यदिव्य शनिवारवाडा, नितीन चंद्रकांत देसाईंवर आशुतोष गोवारीकरांनी सोपवली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 11:29 IST2018-05-01T05:59:53+5:302018-05-01T11:29:53+5:30
ऐतिहासिक विषय असलेले सिनेमा तयार करण्यात हातखंडा असलेले दिग्दर्शक अशी आशुतोष गोवारीकर यांची ओळख. लगान, जोधा अकबर, मोहेन्जेदडो असे ...

‘पानीपत’ सिनेमासाठी साकारला जातोय भव्यदिव्य शनिवारवाडा, नितीन चंद्रकांत देसाईंवर आशुतोष गोवारीकरांनी सोपवली जबाबदारी
ऐ िहासिक विषय असलेले सिनेमा तयार करण्यात हातखंडा असलेले दिग्दर्शक अशी आशुतोष गोवारीकर यांची ओळख. लगान, जोधा अकबर, मोहेन्जेदडो असे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सिनेमा आशुतोष गोवारीकरने आजवर रसिकांच्या भेटीला आणले आहेत. या सिनेमांची कथा आणि रुपेरी पडद्यावरील सादरीकरण रसिकांना भावलं. त्यामुळे आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेमांना तिकीट खिडकीवर चांगलं यश मिळालं. या सगळ्या सिनेमांची आणखी एक खास बात म्हणजे या सिनेमांचे भव्यदिव्य आणि डोळे दिपवणारे सेट्स. कथेनुसार सिनेमात भव्यदिव्य सेट्स साकारत आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या सिनेमांचं वेगळेपण कायम ठेवलं. तो ऐतिहासिक काळ आणि लूक या भव्यदिव्य सेट्सच्या माध्यमातून साकारण्यात आजवर आशुतोष गोवारीकर यांना यश आलं आहे. लवकरच आशुतोष गोवारीकर यांचा पानीपत हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. पानीपत या सिनेमाला भव्यदिव्य करण्यासाठी आशुतोष गोवारीकर कोणतीही कसर सोडणार नसल्याचे बोललं जात आहे. त्यासाठीच आशुतोष शनिवारवाड्याचा भव्यदिव्य असा सेट उभारणार आहेत. हुबेहूब शनिवारवाडा साकारण्याची जबाबदारी त्यांनी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपवली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारवाडा सेट उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत या सिनेमात अर्जुन कपूर, संजय दत्त, कृती सॅनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 6 डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारवाडा हा पेशव्यांच्या साम्राज्याचा बालेकिल्ला होता. त्यामुळे तो भव्यदिव्य असावा असा आशुतोष गोवारीकर यांचा प्रयत्न आहे. पानीपतच्या रणांगणावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या. या तिन्ही लढाया ऐतिहासिक ठरल्या.