​ऐश सल्लूमियांच्या पाठीशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 22:11 IST2016-04-26T16:41:00+5:302016-04-26T22:11:00+5:30

टाईमलेस ब्युटी ऐश्वर्या आणि ‘भाईजान’ सलमानचे नाते तर जग जाहीर होते. दोघांच्या बे्रक अप एवढी चर्चा इतर कोणत्याच ब्रेक ...

Ash Salumiyya's support? | ​ऐश सल्लूमियांच्या पाठीशी?

​ऐश सल्लूमियांच्या पाठीशी?

ईमलेस ब्युटी ऐश्वर्या आणि ‘भाईजान’ सलमानचे नाते तर जग जाहीर होते. दोघांच्या बे्रक अप एवढी चर्चा इतर कोणत्याच ब्रेक अपच झाली नसेल. वेगळे झाल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या नेहमी अंतर बाळगून असत.

एकमेकांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना खुबीन बगल देत ते त्याविषयी बोलण्याचे टाळायचे. सलमान आणि ऐश्वर्या ही नावे एका वाक्यात नाही येणार याची दोघे पुरेपुर काळजी घेत.

असे म्हणतात ना काळानुसार सर्व दुरावे, कटुपणा थोडासा सौम्य होतो. तसेच काहीसे ऐश्वर्या आणि सलमानच्या बाबातील घडताना दिसत आहे. नुकेतच ऐश्वर्याने रिओ आॅलम्पिकचा सदिच्छादुत म्हणून सलमानच्या निवडीला समर्थन दिले आहे.

सलमान ऐवजी सदिच्छादुत म्हणून एखाद्या खेळाडूची निवड करणे योग्य ठरले असते, असा एक प्रतिवाद केला जात आहे. त्यामुळे सलमानला पाठिंबा देणारा व विरोध करणारा असे दोन गट तयार झाले आहेत. 

एका कार्यक्रमात ऐश्वर्याला जेव्हा याबाबत विचारले तेव्हा ती म्हणाली की, देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किंवा कला, खेळ, संगीत क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारी व्यक्तीला माझा पाठिंबा आहे.’

ऐशने जरी थेट सलमानचे नाव नसले घेतले तरी तिच्या शब्दांच्या मागचा अर्थ लपून राहिला नाही.

Web Title: Ash Salumiyya's support?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.