पतीसाठी ऐश बनली ‘स्टायलिस्ट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 10:16 IST2016-11-08T17:56:58+5:302016-11-09T10:16:23+5:30

अमिताभ बच्चन यांची लाडकी मुलगी श्वेता नंदा बच्चन हिने नुकताच ‘अबू जानी संदीप खोसला’ यांच्यासाठी केलेला रॅम्पवॉक आठवतोय ना? ...

Ash made 'stylist' for husband! | पतीसाठी ऐश बनली ‘स्टायलिस्ट’!

पतीसाठी ऐश बनली ‘स्टायलिस्ट’!

िताभ बच्चन यांची लाडकी मुलगी श्वेता नंदा बच्चन हिने नुकताच ‘अबू जानी संदीप खोसला’ यांच्यासाठी केलेला रॅम्पवॉक आठवतोय ना? तिच्यावरच तुमची नजर खिळली होती की गुलाबी रंगाचा ब्लेझर अन् डेनिम्समध्ये आलेल्या ज्युनियर बच्चन अभिषेकवर? अभिषेकही या रॅम्पवॉकमध्ये भाव खाऊन गेला. पण त्याला एवढा फॅशन सेन्स आला तरी कुठून? याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो आहोत. होय, अभिषेकची त्याची फॅशन स्टायलिस्ट दुसरे तिसरे कुणी नसून त्याची पत्नी ऐश्वर्या रॉय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन आहे.  होय, हे अगदी खरे आहे.

रॅम्पवॉकनंतर ‘हॅण्डसम हंक’ अभिषेकला त्याच्या कुल लूकविषयी विचारण्यात आले असता खुद्द त्यानेच हा खुलासा केला. ‘ऐश आणि आराध्या त्यांच्या चॉईसनी माझ्यासाठी कपडे खरेदी करतात. नवल वाटेल पण अनेकदा आराध्याही मला फॅशन टीप्स देत असते. तिच्या आवडीचा ड्रेस घालावा, अशी आराध्याची इच्छा असते. मला तिचे कौतुक वाटते,’ असे अभिषेक म्हणाला. यावेळी ‘ऐ दिल हैं मुश्किल’मधील ऐशच्या अभिनयाचेही त्याने भरभरून कौतुक केले. तो म्हणाला,‘मी माझ्या फुटबॉल टीमसोबत प्रवासात असल्याने इच्छा असूनही मला तिचा चित्रपट पाहता आला नाही. पण, ऐश त्यात खुपच स्टनिंग दिसत आहे. करण आणि त्याच्या टीमचे मी अभिनंदन करतो.’

‘हाऊसफुल्ल ३’ मधील विनोदी भूमिकेनंतर अभिषेककडे सध्या कुठलाच चित्रपट नाही. फुटबॉलच्या टीमसोबत तो सध्या ट्रॅव्हलिंग करतोय. त्याला चित्रपटांचा विसर पडलाय की, कुठला दिग्दर्शक त्याला चित्रपट द्यायला तयार नाहीये... हे मात्र तोच सांगू शकेल!

abhishek bacchan

Web Title: Ash made 'stylist' for husband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.