श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच शूटिंगसोडून मुंबईत परतला अर्जुन कपूर, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 19:39 IST2018-02-25T12:57:28+5:302018-02-25T19:39:51+5:30

सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी दुबई येथे अखेरचा ...

Arjun Kapoor returned to Mumbai after knowing about Sridevi's death, see photo! | श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच शूटिंगसोडून मुंबईत परतला अर्जुन कपूर, पाहा फोटो!

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच शूटिंगसोडून मुंबईत परतला अर्जुन कपूर, पाहा फोटो!

परस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी दुबई येथे अखेरचा श्वास घेतला. जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा देश-विदेशात असलेले बॉलिवूडचे बरेचसे स्टार शूटिंग सोडून मुंबईत परतत आहेत. श्रीदेवी यांचा सावत्र मुलगा अभिनेता अर्जुन कपूर हादेखील आता मुंबईत परतला आहे. अर्जुन त्याच्या आगामी ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. जेव्हा त्याला ही बातमी समजली तेव्हा त्याने मुंबई गाठली. 







दुसरीकडे अभिनेता अनिल कपूर, रेखा, नीलिमा आजमी, वैभवी मर्चेंट यांनीदेखील श्रीदेवीचे घर गाठले. सध्या बरेचसे अभिनेते चित्रपटांच्या शूटिंगसाठी विदेशात आहेत. मात्र या बातमीमुळे सर्वच मुंबईत परतत आहे. दरम्यान श्रीदेवी यांचे पार्थिव रात्री उशिरापर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. 







दुबईत पार्थिव मिळविण्यासाठी कायदेशीर नियमांचे पुर्तता करणे गरजेचे असल्याने पार्थिव भारतात आणण्यासाठी विलंब होत आहे. दरम्यान आतापर्यंत नियमांची सर्व पूर्तता झाली असून, रात्री आठ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Arjun Kapoor returned to Mumbai after knowing about Sridevi's death, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.