सावत्र बहिणींसोबत दिसली अर्जुन कपूरची बॉण्डिंग; तिन्ही बहिणींसोबत दिली अशी पोज, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:26 IST2018-05-09T09:55:58+5:302018-05-09T15:26:08+5:30

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूरने सर्व कटुता विसरून आपल्या दोन्ही सावत्र बहिणींना आपलेसे केले आहे. सोनमच्या लग्नात तर यांच्यातील बॉण्डिंग बघण्यासारखी होती.

Arjun Kapoor bonding with step sister; Pose with all the three sisters, see the video! | सावत्र बहिणींसोबत दिसली अर्जुन कपूरची बॉण्डिंग; तिन्ही बहिणींसोबत दिली अशी पोज, पाहा व्हिडीओ!

सावत्र बहिणींसोबत दिसली अर्जुन कपूरची बॉण्डिंग; तिन्ही बहिणींसोबत दिली अशी पोज, पाहा व्हिडीओ!

िनेत्री सोनम कपूरचे काल पंजाबी रीतिरिवाजानुसार लग्न पार पडले. बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत ती लग्नाच्या बंधनात अडकली. मंगळवारीच रात्री मुंबईतील हॉटेल लीला याठिकाणी त्यांच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले होते. ज्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. निर्माते बोनी कपूरही या सोहळ्यात आपल्या परिवारानिशी उपस्थित होते. अर्जुन कपूर याच्यासह अंशुला कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूरसोबत ते याठिकाणी आले होते. यावेळी अर्जुन आणि अंशुलाची आपल्या सावत्र बहिणींसोबतची बॉण्डिंग बघण्यासारखी होती. खरं तर श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन आपल्या दोन्ही सावत्र बहिणींच्या आणखीनच क्लोज आला आहे. यावेळी त्याने मीडियाच्या समोरच बहीण जान्हवी आणि खुशीसोबत पोज दिली. यावेळी अर्जुनची बहीण अंशुलाही उपस्थित होती. 



अर्जुन आपल्या तिन्ही बहिणींसोबत माध्यमांसमोर जाताना खूपच उत्साहित असल्याचे दिसून आला. यावेळी अर्जुनने ब्लॅक शेरवानी घातली होती. बोनी कपूरने नेव्ही ब्लू शेरवानी परिधान केली होती. तर तिन्ही कपूर सिस्टर्स ट्रेडिशन लूकमध्ये बघावयास मिळाल्या. खुशी कपूरने डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला रेड अ‍ॅण्ड येलो रंगाचा लहेंगा परिधान केला होता. तर जान्हवी आणि अंशुला मॅचिंग आउटफिटमध्ये बघावयास मिळाले. 





तुमच्या माहितीसाठी, अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर निर्माता बोनी कपूर आणि मोना शौरी यांची मुले आहेत. बोनी यांनी मोना यांना घटस्फोट दिल्यानंतर श्रीदेवी यांच्याशी लग्न केले होते. पुढे त्यांना खुशी आणि जान्हवी या दोन मुली झाल्या. असे म्हटले जाते की, दोन्ही परिवारामध्ये खूपच कटुता होती. अर्जुनने श्रीदेवी यांना कधीच आपलेसे केले नाही. असाच काहीसा पवित्रा श्रीदेवी यांचाही होता. परंतु त्यांच्या निधनानंतर मात्र अर्जुनने सर्व काही विसरून पापा बोनीला आधार दिला. त्याचबरोबर दोन्ही सावत्र बहिणींना आपलेसे केले. 
 

सध्या अर्जुन वडील बोनी यांचा आधार बनला असून, त्यांना प्रत्येक अडचणीत तो मदत करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर अंशुला आणि जान्हवी व खुशीचाही तो सांभाळ करताना दिसत आहे. सोनम कपूरच्या लग्नाच्या पार्टीत तर त्यांच्यातील बॉण्डिंग चांगलीच घट्ट असल्याचे दिसून आले. 

Web Title: Arjun Kapoor bonding with step sister; Pose with all the three sisters, see the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.