अनुष्का शेट्टीने पुन्हा एकदा नाकारला बॉलिवूडचा चित्रपट! कारण आहे प्रभास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 15:02 IST2018-03-09T09:32:31+5:302018-03-09T15:02:31+5:30

टॉलिवूडसोबतचं बॉलिवूडचेही सर्वाधिक लोकप्रीय आॅनस्क्रीन कपल प्रभास आणि अनुष्का शेट्टी सध्या रिअल लाईफमध्येही एकमेकांना फॉलो करत आहेत. पण ताजी ...

Anushka Shetty once again rejected Bollywood movie! The reason is Prabhas !! | अनुष्का शेट्टीने पुन्हा एकदा नाकारला बॉलिवूडचा चित्रपट! कारण आहे प्रभास!!

अनुष्का शेट्टीने पुन्हा एकदा नाकारला बॉलिवूडचा चित्रपट! कारण आहे प्रभास!!

लिवूडसोबतचं बॉलिवूडचेही सर्वाधिक लोकप्रीय आॅनस्क्रीन कपल प्रभास आणि अनुष्का शेट्टी सध्या रिअल लाईफमध्येही एकमेकांना फॉलो करत आहेत. पण ताजी बातमी त्यांच्या कथित रिलेशनशिपबद्दल नाही तर अनुष्काबद्दल आहे. होय, ताज्या बातमीनुसार, अनुष्काने पुन्हा एकदा बॉलिवूडची आॅफर धुडकावून लावली आहे. विशेष म्हणजे, अनुष्काने प्रभासच्या सांगण्यावरून ही आॅफर नाकारली, अशीही चर्चा आहे.
चर्चा खरी मानाल तर, अनुष्काला बॉलिवूडची आॅफर मिळाली होती. पण तिने प्रभासच्या सल्लयानुसार या चित्रपटाला नकार दिला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभासला अनुष्कासोबत बॉलिवूड डेब्यू करायचा आहे. दोघांनीही एकत्र बॉलिवूडमध्ये एन्ट्री घ्यावी, अशी त्याची इच्छा आहे. चाहत्यांना प्रभास व अनुष्का दोघांकडूनही प्रचंड अपेक्षा आहेत. प्रभास हे जाणून आहे. त्यामुळे दोघांचाही हा डेब्यू सिनेमा कुण्या नव्या दिग्दर्शकाऐवजी युव्ही क्रिएशनने बनवावा, अशीही त्याची इच्छा आहे. युवी क्रिएशननेच प्रभासचा ‘साहो’ आणि अनुष्काचा ‘भागमती’ प्रोड्यूस केला आहे.

ALSO READ : ​विरह झाला असह्य! चेह-याला रूमाल बांधून अनुष्का शेट्टीला भेटायला पोहोचला प्रभास!!

अनुष्काने यापूर्वी करण जोहरची आॅफर धुडकावून लावली होती. या चित्रपटातील भूमिका अनुष्काला न आवडल्याने तिने करणला नकार दिला होता. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘तमाशा’ हा चित्रपटही अनुष्काने रिजेक्ट केला होता. अनुष्काप्रमाणेच प्रभासनेही बॉलिवूडच्या आॅफर्स नाकारल्या आहेत.
तूर्तास प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या चर्चा जोरात आहेत. अलीकडे प्रभासला अनुष्कासोबतच्या लिंकअपबाबत प्रश्न विचारला गेला होता.  हा प्रश्न ऐकून प्रभास गालातल्या गालात हसला होता. ‘मी व अनुष्का गेल्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आपल्या लिंकअपच्या बातम्या होऊ द्यायच्या नाहीत, हे आम्ही फार पूर्वीच ठरवले होते. पण या बातम्या येत राहिल्या आणि आता...? आता तर आमच्यात काही तरी आहे, असे मलाही वाटू लागले आहे,’ असे प्रभास यावर म्हणाला होता. 
 

Web Title: Anushka Shetty once again rejected Bollywood movie! The reason is Prabhas !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.