भोपाळच्या बसस्टँडवर वरुण धवनसोबत दिसली अनुष्का शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 16:22 IST2018-03-24T10:45:48+5:302018-03-24T16:22:20+5:30
अनुष्का शर्मा आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येते. ग्लॅमरस अंदाजात दिसणार अनुष्का नुकतीच भोपाळच्या बस स्टँडवर साध्या निळ्या रंगाचा ...

भोपाळच्या बसस्टँडवर वरुण धवनसोबत दिसली अनुष्का शर्मा
अ ुष्का शर्मा आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगवेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येते. ग्लॅमरस अंदाजात दिसणार अनुष्का नुकतीच भोपाळच्या बस स्टँडवर साध्या निळ्या रंगाचा साडीमध्ये दिसली. अनुष्कासोबत वरुण धवनसुद्धा आपल्याला दिसतो आहे. अनुष्का फार चिंतेत आहे आणि वरूण तिची समजूत काढताना दिसतो आहे.
![]()
तर दुसऱ्या फोटोमध्ये वरूण आपल्या चाहत्यांना हात दाखवून हॅलो बोलताना दिसतो आहे. खरंतर भोपाळ मध्ये अनुष्का आणि वरुणच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. बस स्टॉपवरच्या या सीनसोबतच चित्रपटाचे शूटिंग सुद्धा पूर्ण झाले आहे. सध्या अनुष्का यश राजच्या 'सुई धागा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून 'मौजी' असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल.दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत. शरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.मात्र वरुण आणि अनुष्काचा हटके लूक तसंच सायकलस्वारीमुळे सिनेमाची आतापासूनच 'सुई धागा' सिनेमाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
ALSO READ : अन् खासगी आयुष्याबद्दलची मुलाखत पाहून भडकली अनुष्का शर्मा!
अनुष्का यानंतर शाहरुख खानच्या झिरो चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खान झिरोमध्ये बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. तर वरुण धवनचा 'अक्टूबर' चित्रपट एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.