​तृषा साकारणार ‘एनएच10’मधील अनुष्का!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 15:51 IST2016-10-26T15:51:44+5:302016-10-26T15:51:44+5:30

अनुष्का शर्मा निर्मित ‘एनएच10’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. समीक्षकांनी यातील अनुष्काच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले होते. आता ‘एनएच10’चा ...

Anushka in 'NH10' | ​तृषा साकारणार ‘एनएच10’मधील अनुष्का!!

​तृषा साकारणार ‘एनएच10’मधील अनुष्का!!

ुष्का शर्मा निर्मित ‘एनएच10’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. समीक्षकांनी यातील अनुष्काच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले होते. आता ‘एनएच10’चा तामिळ रिमेक येतोय. आता या तामिळ रिमेकमध्ये  अनुष्काची भूमिका कोण साकारणार? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर आमच्या माहितीनुसार, तामिळ अभिनेत्री तृषा कृष्णन हिला या भूमिकेची लॉटरी लागली आहे. अर्थात अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एनएच10’मधील अनुष्काची भूमिका तृषाला आॅफर झाली आहे. तृषा ही सुद्धा या भूमिकेसाठी प्रचंड उत्सूक आहे. तृषाच्या अपोझिट कुण्या हिरोची वर्णी लागणार, हे अद्याप कळलेले नाही.
खाप पंचायतीने दिलेल्या एका सत्य घटनेतील निकालानंतर घडलेल्या हत्या प्रकरणावर आधारित ‘एनएच10’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शकाने अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून  भारतीय स्त्री-पुरुष भेद, जात व्यवस्था, जात व्यवस्थेत पिचलेल्या तरुणींचे आयुष्य तसेच शहरी आधुनिक विचारांच्या व्यक्तिस्वातंत्र्य अनुभवणा-या भारतीय तरुणींची मानसिकता याचे समर्पक दर्शन घडविले आहे. 
नील भूपालमने ‘एनएच10’ या चित्रपटात अनुष्काच्या पतीची अर्थात अर्जुनची भूमिका केली आहे. या संपूर्ण चित्रपटात मीराची भूमिका करणारी अनुष्का शर्मा भाव खाऊन जाते. ‘एनएच10’द्वारे अनुष्काने केवळ निर्मिती क्षेत्रात पाऊलच ठेवले नाही तर तिच्या यापूर्वीच्या भूमिकांद्वारे बनलेली प्रतिमाही बदलण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यात ती यशस्वीही झाली. आता तृषाने अनुष्काची ही भूमिका साकारलीच तर ती त्या भूमिकेला कसा आणि किती न्याय देते, ते बघूच!

Web Title: Anushka in 'NH10'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.